शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासोबत पत्नीला नको त्या अवस्थेत बेडरुममध्ये पाहिलं; पती संतापला अन् थेट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 10:02 IST

पतीला लपवून प्रियकराला दररोज भेटायची पत्नी, अनेकदा घरी यायचा प्रियकर, शेजाऱ्यांनी पतीला सांगितलं. 

भोपाळ - सध्या विवाहबाह्य संबंधांमुळे घडणाऱ्या गुन्ह्यांच्या अनेक बातम्या समोर येत असतात. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे घटस्फोट होतात, काही वाद खूनापर्यंत पोहचतात. असाच एक प्रकार मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यात समोर आला आहे. ज्याठिकाणी एका युवकाने त्याच्या पत्नीला प्रियकरासोबत बेडरूममध्ये पकडलं. हे पाहून पतीचा राग अनावर झाला आणि त्यानंतर जे घडलं त्यामुळे सगळेच हैराण झाले. 

घरातील बेडरुममध्ये पत्नीला नको त्या अवस्थेत तिच्या प्रियकरासोबत पाहून पती संतापला. त्याने किचनमध्ये जात तिथे ठेवलेली कुऱ्हाड घेतली आणि पत्नीच्या प्रियकरावर हल्ला केला. यावेळी बचावासाठी आलेल्या पत्नीलाही मारून टाकलं. त्यानंतर आरोपी पती जवळच्या पोलीस स्टेशनला गेला. आरोपीच्या अंगावरील कपड्यांवर रक्ताचे डाग पाहून पोलीस सतर्क झाले, त्याच्या हातात कुऱ्हाड होती. मी माझ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला संपवलंयं, मला अटक करा, मला कुठलाही पश्चाताप नाही असं आरोपीने पोलिसांकडे कबुली दिली. 

युवकाची अवस्था पाहून पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी शॉक झाले होते. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याचा जबाब घेतला, त्यावेळी तो म्हणाला की, मी सिव्हिल लाईनमध्ये राहतो. एक वर्षापूर्वी पूजा नावाच्या युवतीसोबत माझं लग्न झालं होतं. आम्ही दोघेही खुश होतो परंतु तिचं माझ्यावर नाही तर अन्य कुणावर प्रेम होतं हे मला माहिती नव्हतं. ज्याच्यावर ती प्रेम करायची तो तिचाच नातेवाईक होता. तो नेहमी आमच्या घरी यायचा. परंतु मला कधीही या दोघांवर संशय आला नाही. मात्र ६ महिन्यापासून तो सतत माझ्या घरी यायचा. अनेकदा मी घरात नसताना यायचा हे मला शेजाऱ्यांकडून समजायचे असं त्याने पोलिसांना सांगितले. 

मी बुधवारी त्या नातेवाईकाला घराच्या आसपास फिरताना पाहिले तेव्हा माझा संशय खरा ठरला. माझ्या पत्नीने मला मार्केटमधून सामान आणायला सांगितले, मला या दोघांना रंगेहाथ पकडायचं होतं. त्यासाठी मी मुद्दाम त्याठिकाणाहून निघून गेलो. परंतु मार्केटला न जाता दुसऱ्या गल्लीत जाऊन उभा राहिलो. थोड्या वेळानंतर मी अचानक घरी गेलो, दरवाजा वाजवला तेव्हा पत्नीऐवजी त्या नातेवाईकाने दरवाजा उघडला. मला पाहून तो भांबरला. मी लगेच बेडरुममध्ये गेलो तेव्हा माझ्या पत्नीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्यानंतर माझा राग अनावर झाला आणि मी दोघांनाही संपवून टाकलं असं आरोपीने पोलिसांना म्हटलं.दरम्यान, आरोपी युवकाचा जबाब घेत पोलिसांनी घटनास्थळ गाठलं तेव्हा संपूर्ण खोलीत रक्त सांडलं होतं. दोघांचेही मृतदेह तिथेच पडले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवले. सध्या आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी