शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:40 IST

Video - एक पती आपल्या पत्नीला परत घरी नेण्यासाठी सासूचे पाय धरून गयावया करत होता.

उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक पती आपल्या पत्नीला परत घरी नेण्यासाठी सासूचे पाय धरून गयावया करत होता. "माझ्या पत्नीला परत पाठवा," अशी विनवणी तो रडत-रडत सासूकडे करत होता, पण सासूने आपल्या रडणाऱ्या जावयाचं काहीही ऐकलं नाही आणि तिला बाजूला सारून ती तिथून निघून गेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी घडली. पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर मथुरा येथील रहिवासी संजय अलिगढच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला होता. तिथे पती-पत्नीमध्ये चर्चा झाली, पण आईने आपल्या मुलीला जावयासोबत पाठवण्यास स्पष्ट नकार दिला. यावर हतबल झालेला संजय सासूचे पाय पकडून रडू लागला आणि "आई, माझ्यावर दया करा" असं म्हणू लागला. तो पोलिसांसमोर हात जोडून न्यायाची मागणी करत होता.

महिला पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर पोलीस लाईन परिसरात संजयने आधी पत्नीला समजावण्यासाठी हात जोडले. मात्र, जेव्हा काहीच उपयोग झाला नाही, तेव्हा तो पोलीस लाईनच्या गेटवर सासूच्या पाया पडला. "आई, दया करा... तुमच्या मुलीला समजवा आणि माझ्यासोबत पाठवा" असं तो वारंवार म्हणत होता. परंतु, पतीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

या घटनेबाबत बोलताना संजयने सांगितलं की, त्याचा विवाह गोंडा क्षेत्रातील पिंजरी गावातील एका तरुणीशी झाला आहे. तो मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला तीन मुलं असून मोठा मुलगा आठ वर्षांचा आणि दिव्यांग आहे. संजयचा आरोप आहे की, मुलाच्या उपचाराच्या नावाखाली त्याच्याकडून पैसे घेतले गेले, पण उपचार केले नाहीत. इतकेच नाही तर, पत्नीने माहेरच्या लोकांना बोलावून त्याला मारहाण केली आणि दागिने घेऊन पळून गेली, असाही आरोप त्याने केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Desperate husband begs mother-in-law to send wife back home.

Web Summary : In Aligarh, a husband pleaded with his mother-in-law to send his wife back, even falling at her feet. The mother-in-law refused, ignoring his pleas. The distraught husband alleged his wife took money and jewelry before leaving.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओ