Video : हृदयद्रावक! मुलीने वाचविले आत्महत्या करणाऱ्या आईचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 21:26 IST2018-11-30T21:24:45+5:302018-11-30T21:26:47+5:30
दोघीही जखमी झाल्या. त्यांना तातडीनं कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान, आईची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे

Video : हृदयद्रावक! मुलीने वाचविले आत्महत्या करणाऱ्या आईचे प्राण
मुंबई - जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ लोकलखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याऱ्या आईला मुलीने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यावेळी दोघीही जखमी झाल्या. त्यांना तातडीनं कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान, आईची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर घडला धक्कादायक प्रकार दुपारी ४. ३९ वाजताच्या सुमारास घडला आहे. ३८ वर्षीय सुनीता विधाले यांनी जलद लोकलसमोर धाव घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र १६ वर्षीय मुलीने तिला वाचविण्यासाठी तिनेही तिच्या पाठीमागून धाव घेतली. समोरून भरधाव वेगाने येणारी लोकल या दोघींच्या अंगावरून गेल्यानंतर थांबली. यात मायलेकी जखमी झाल्या. सुनीता यांचा उजवा हात धडावेगळा झाला आणि मुलीच्या कपाळाला, डोळ्याला मार लागला आहे. या दोघीनांही जखमी अवस्थेत कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुनीताचे पती संदीप यांनी हा अपघात असून आत्महत्येचा प्रयत्न नसल्याचे सांगितले. सुनीता यांची प्रकृती चिंताजनक असून मुलीच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.