Exclusive : पूजा चव्हाण प्रकरण नेमकं कसं बाहेर आलं?; ॲाडिओ क्लिप्स कशा झाल्या व्हायरल?... वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 03:39 PM2021-02-15T15:39:08+5:302021-02-15T15:40:14+5:30

Pooja Chavan Case : दवाखान्यातच पोहोचल्यावर घरमालकांनी अरुण आणि विलास यांच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली.

How exactly did the Pooja Chavan case come out ?; How did the audio clips go viral? ... read on | Exclusive : पूजा चव्हाण प्रकरण नेमकं कसं बाहेर आलं?; ॲाडिओ क्लिप्स कशा झाल्या व्हायरल?... वाचा

Exclusive : पूजा चव्हाण प्रकरण नेमकं कसं बाहेर आलं?; ॲाडिओ क्लिप्स कशा झाल्या व्हायरल?... वाचा

googlenewsNext
ठळक मुद्देयानंतर त्यांनी जवळच रहात असलेल्या आपल्या रिक्षाचालक मित्राला बोलावून या मुलीला या दोन तरुणांसह दवाखान्यात उपचारांसाठी पाठवून दिले. घटना गंभीर आणि संशयास्पद असल्याचे वाटल्याने त्यांनी या संदर्भात पोलिस कंट्रोल रुमला फोन करुन घटनेची माहिती दिली.

पूजा चव्हाणआत्महत्या प्रकरणी तिच्या वडिलांनी या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांना क्लीन चिट दिली आहे. यानंतही भाजप नेते या प्रकरणात थेट त्यांचाच संबंध असल्यावर ठाम आहेत. मात्र, हे संपूर्ण प्रकरण नेमकं बाहेर आले कसे? या मध्ये संजय राठोड यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपा नेते इतका ठामपणे कसा करत आहेत हे जाणून घेण्यासाठी लोकमतने पुण्यातल्या ज्या भाजपा नेत्याने हे प्रकरण बाहेर काढले, त्यांनाच थेट लोकमतने गाठले.

 

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत गृहमंत्र्यांनी दिले स्पष्ट अन् महत्वाचे संकेत; म्हणाले...

 


त्यांच्या मते, या संपूर्ण प्रकरणात संजय राठोड यांचा सहभाग असल्याची कबूली खुद्द अरुण राठोडनेच दिली आहे. इतकंच नाही तर आपण या प्रकरणात अडकू नये यासाठी या ऑडिओ क्लिप्स देखील त्यानेच भाजपा नेत्यांना दिल्या. या नेत्याच्या म्हणण्याप्रमाणे, घटनास्थळापासून जवळच त्या भाजपा नेत्याचे घर आहे. रात्री जोरात आवाज झाल्याने ते त्यांनी नेमके काय झाले आहे हे घरातूनच पाहण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका झाडाआड दोन मुलांची गडबड सुरु असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने भाजपा नेते पाहणी करायला तातडीने त्या ठिकाणी धावले. तिथे पोहोचल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या बाजुलाच या प्रकरणात सातत्याने नाव येत असलेले अरुण आणि विलास हे दोन तरुण उभे असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले.

Pooja Chavan Case : आम्हाला बदनाम करू नका, अन्यथा..., पूजा चव्हाणच्या वडिलांचा संताप

 

यानंतर त्यांनी जवळच रहात असलेल्या आपल्या रिक्षाचालक मित्राला बोलावून या मुलीला या दोन तरुणांसह दवाखान्यात उपचारांसाठी पाठवून दिले. घटना गंभीर आणि संशयास्पद असल्याचे वाटल्याने त्यांनी या संदर्भात पोलिस कंट्रोल रुमला फोन करुन घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिथे आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांच्यासोबत ते पुन्हा घटनास्थळी गेले. पोलिसांसोबतच त्यांनी या मुलांच्या घरामध्येही पाहणी केली. यावेळी या घरात पूजा ज्या खोलीत रहात होती, त्याचा दरवाजाही बंद असल्याचे त्यांना दिसले. एकूणच प्रकरण संशयास्पद असल्याचे जाणवल्याने त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळावर आल्यावरही त्यांच्यासोबत पहाणी केली. ज्या घरात पूजा रहात होती त्या घराचे मालकही थोड्या वेळात घटनास्थळी आले. घटनास्थळी आलेल्या या मालकांशी ओळख असल्याने ते आल्याचे कळवण्यासाठी त्यांनी पोलिसांशी संपर्क साधलाा. दरम्यान पूजाला ज्या खासगी दवाखान्यात पोलिस घेवून गेले होते त्या दवाखान्यात पोलिस पोहोचले होते. पोलिसांनी घरमालकांना या दवाखान्यातच बोलावून घेतले.


दवाखान्यातच पोहोचल्यावर घरमालकांनी अरुण आणि विलास यांच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी अरुण फोनवर बोलत होता. अरुण आणि विलास यांनी वेगवेगळी उत्तरे दिल्याने संशय आल्याने घरमालक आणि भाजपा नेत्याने त्यांच्याकडे आणखी सखोल चौकशी करायला सुरुवात केल्याचा दावा त्या नेत्यांनी केला आहे. यानंतर आपण या प्रकरणात अडाण्याची शक्यता लक्षात आल्याने अरुणने या प्रकरणात संजय राठो़ड यांचे नाव स्वत: घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. थेट मंत्र्याचे नाव आल्याने पुरावा मागितल्यावर अरुणने आपल्याकडे कॉल रेकॅार्डींग असल्याचे सांगत त्या तातडीने आपल्याला पाठवल्याचे या नेत्याचे म्हणणे आहे. तसेच आपल्याशी तो बोलत असताना संजय राठोड यांचा फोन सुरु होता आणि तो संपूर्ण आवाज देखील रेक़ॅार्डींगमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला आहे.



चौकशी केल्यानंतर घटना घडली तेव्हा पूजा ही कठड्यावर बसलेली होती. तर अरुण खाली येऊन तिला उडी मारु नये म्हणून विनवत असल्याचे समजल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अरुणने पूजाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने मद्यप्राशन केल्याने तो तिला पकडू शकला नाही आणि थेट डोक्यावर तिला जखम झाली असे भाजपा नेते पुढे म्हणाले.



या भाड्याच्या घरात अरुण आणि विलास हे साधारण महिनाभरापासून रहात होते. घरमालकांना घर भाड्याने घेण्यासाठीची कागदपत्रे त्यांनी सुपुर्द केली होती. मात्र, पूजा इथे आठ दिवसांपासून रहात असल्याचे लक्षात आल्याने घरमालकाने या दोघांना फ्लॅट रिकामा करायला सांगितल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच पूजाचे पालकही आपल्याला भेटले आणि ते अत्यंत साधे असल्याचे ते पुढे म्हणाले. अशी आहे पूजा चव्हाण आत्महत्येच्या दिवसाची वस्तुस्थिती असा दावा प्रकरण उजेडात आणणाऱ्या भाजपा नेत्याने केला आहे. 

Web Title: How exactly did the Pooja Chavan case come out ?; How did the audio clips go viral? ... read on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.