शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:29 IST

मोतिहारी जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

बिहारमध्येदारूबंदी असली तरी तिथे अजूनही विषारी दारूमुळे लोकांचा मृत्यू होत आहे. मोतिहारी जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी अनेक लोकांची दृष्टी गेली आहे. दोन रुग्णांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 

पोलीस अधीक्षक (एसपी) स्वर्ण प्रभात यांनी चार जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं की, सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एसपींनी माहिती दिली की, या प्रकरणात चौकीदार भरत राय आणि मुख्य आरोपी नागा राय याला त्याच्या कुटुंबातील महिलांसह अटक करण्यात आली आहे. तुर्कौलिया प्रभारी उमाशंकर मांझी यांच्यावरही कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मृतांमध्ये स्थानिक तरुण चंदूचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाईघाईत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरीकडे, रुग्णालयात दाखल असलेला लोहा ठाकूर आणि त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं की, त्याने मंगळवारी रात्री स्पिरीट मिश्रित दारू प्यायली होती. तेव्हापासून त्याची प्रकृती बिघडली असून त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आहे.

चंदूच्या पुतण्याने सांगितलं की, जेव्हापासून दारूबंदी लागू झाली आहे, तेव्हापासून परिसरात शेकडो ठिकाणी अवैध दारूचा व्यवसाय सुरू आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही विषारी दारूची लक्षणं असल्याचे सांगत रुग्णांच्या दृष्टीवर परिणाम झाल्याचे स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वीही मोतिहारीमध्ये विषारी दारू प्यायल्याने ४५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही अशा प्रकारची घटना पुन्हा घडणं प्रशासकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतं.

यापूर्वी याच वर्षी फेब्रुवारीमध्ये रोहतासमध्ये वेगवेगळ्या गावातील एकूण पाच जणांच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली होती. हे लोक एका लग्नकार्यातून परतले होते असं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि एकामागून एक सर्वांचा मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी या मृत्यूंमागे विषारी दारू, किडनी निकामी होणं किंवा कुत्रा चावणं अशी वेगवेगळी कारणं सांगितली होती. मात्र रोहतास पोलीस प्रशासनाने याप्रकरणी अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नव्हती.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Hooch Tragedy: Four Dead, Many Lose Eyesight in Motihari

Web Summary : Four died and seven are hospitalized in Motihari, Bihar, after consuming illicit liquor. Several victims lost their eyesight. Police arrested two, including a local guard, and suspended an officer. Similar incidents occurred previously, raising concerns about the administration's effectiveness.
टॅग्स :Biharबिहारliquor banदारूबंदीDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी