शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाच जिल्ह्यात हनीट्रॅपचे जाळे निर्माण करणारी टोळी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 05:26 IST

संशयित पुणे जिल्ह्यातील : प्रतिष्ठित लोकांना हेरून केले जात होते ब्लॅकमेल

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन प्रतिष्ठित लोकांना हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढणाऱ्या टोळीचा सातारा तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने पर्दाफाश केला. यामध्ये एका महिलेचा समावेश असून, या टोळीने सातारा, पुणे, बारामती, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित लोकांना लुटल्याचे समोर येत आहे.

काजल प्रदीप मुळेकर, अजिंक्य रावसाहेब नाळे, वैभव प्रकाश नाळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या तिघांनाही चार दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. सातारा जिल्ह्यातील एका व्यावसायिकाला एक वर्षापूर्वी हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून लुटण्यात आले होते. एका महिलेने मोबाइलवर अश्लील मेसेज पाठविला. त्यानंतर व्यावसायिकाला भेटण्यास ही महिला सातारा बसस्थानकात आली. त्यानंतर व्यावसायिकाच्या कारने दोघे ठोसेघर येथे गेले. तेथील एका हॉटेलमध्ये बसले असताना तेथे या महिलेचे भाऊ म्हणून तीन ते चारजण आले. त्यांनी व्यावसायिकाला मारहाण करत त्याच्या गाडीतून साताऱ्यात आणले. तुझे अश्लील व्हिडिओ आमच्याकडे असून, हे प्रकरण मिटविण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. व्यावसायिकाने टोळीला सहा लाखाची रोकड, सोने, चांदी तर दिलीच, पण स्वत:ची आलिशान कारही त्यांना दिली होती. फलटण येथे ही कार बेवारस आढळून आल्यानंतर पोलीस संबंधित व्यावसायिकापर्यंत पोहोचले.

जाळ्यात अडकविण्याची पद्धत होती अशी..अविनाश नाळे आणि वैभव नाळे हे दोघे प्रतिष्ठित लोक हेरत असत. व्हॅाटसअ‍ॅपला डीपी एका सुंदर मुलीचा ठेवत होते. संबंधित लोक या मुलांशी मुलगी म्हणून बोलत असत. अश्लील फोटो पाठवून संबंधिताला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत. गरज भासली तर काजल मुळेकर या युवतीला ते तोंडाला स्कार्फ बांधून व्हिडिओ कॉलिंग करायला लावायचे. अश्लील फोटोची देवाण -घेवाण झाल्यानंतर नाळे बंधू सावजाला लुटण्यास सज्ज होत होते. 

साताऱ्यात अजून तिघे जाळ्यातहनीट्रॅपच्या जाळ्यात अडकलेले सातारा शहरात अजून तिघेजण सापडले आहेत. त्यातील एकाने पोलिसांशी संपर्क साधला आहे. मात्र, त्याची तक्रार देण्याची मानसिक स्थिती नसल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :honeytrapहनीट्रॅप