शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

प्रामाणिक रिक्षाचालकाने लाखो रुपये केले परत, पोलिसांनी केला हारतुऱ्यांनी सन्मान 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 9:34 PM

सुदैवाने आपण पैसे विसरल्याचं महिला प्रवाशाला लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि या प्रवाशाला पैसे परत मिळाले.

ठळक मुद्दे काही दिवसांपूर्वी सिद्दी अंबर बाझार परिसरात मोहम्मदने आपल्या रिक्षातून दोन महिलांना सोडलं होतं.नेमक्या कोणत्या प्रवाशाचे पैसे आहेत हे शोधण्याऐवजी हबीबने स्थानिक पोलीस ठाण्यात हे पैसे परत करण्याचं ठरवलं.

कोरोना महामारीमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रत्येकाला पैशाची गरज आहे. अशा परिस्थिती वाहतूक बंद असल्याने रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांच्या कमाईत  घट झाली आहे. तरीदेखील अशा महामारीच्या बिकट परिस्थितीत प्रामाणिकपणा हरवलेला नाही. हैदराबादमधील मोहम्मद हबीब हा त्याचेच एक उदाहरण आहे. रिक्षाच्या तोडक्यामोडक्या कमाईवर घर चालवणाऱ्या हबीबला रिक्षेत घबाड सापडलं. आर्थिक अडचण असतानाही हबीबने आपल्या रिक्षात एक लाखापेक्षा जास्त रक्कम विसरुन गेलेल्या महिला प्रवाशाचे पैसे जबाबदारीने पोलिसांकडे परत केले. सुदैवाने आपण पैसे विसरल्याचं महिला प्रवाशाला लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि या प्रवाशाला पैसे परत मिळाले. रिक्षाचालकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे पोलिसांनी त्याचा हार घालून सत्कार केला. काही दिवसांपूर्वी सिद्दी अंबर बाझार परिसरात मोहम्मदने आपल्या रिक्षातून दोन महिलांना सोडलं होतं. यानंतर दुपारी अडीच वाजल्याच्या दरम्यान मोहम्मद आपल्या नेहमीच्या स्टँडवर परतला. यावेळी प्रवासी सीटकडे त्याची नजर गेली असतान मोहम्महला एक बॅग दिसली. या बॅगेत कोणती बॉम्ब तर नसेल ना या भीतीपोटी मोहम्मदने आपल्या रिक्षामालकाला ती बॅग दाखवली. बॅग तपासली असता त्यात पैसे असल्याचं कळलं. त्या बॅगेत १ लाख ४० हजारांची रक्कम होती. नेमक्या कोणत्या प्रवाशाचे पैसे आहेत हे शोधण्याऐवजी हबीबने स्थानिक पोलीस ठाण्यात हे पैसे परत करण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे हबीबने ते पैसे पोलिसांच्या स्वाधिन केले. त्याआधी पैशांची खरी मालक असलेल्या आयेशा या महिलेने पोलीस ठाण्यात आपली बॅग हरवल्याची तक्रार दाखल केली होती.चौकशी केली असतान रिक्षाचालकाने परतवलेली बॅग हीच आयेशा यांची बॅग होती हे तपास करून त्यांना परत केली. यात कोणत्याही प्रकारची अधिकृत तक्रार दाखल झाली नव्हती त्यामुळे आम्ही लगेचच ते पैसे आयेशा यांच्या ताब्यात दिल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकारी के. सुदर्शन यांनी दिली. मोहम्मद हबीब याने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे आयेशा यांनी त्याला ५ हजार रुपये बक्षीस दिलं. पोलिसांनीही मोहम्मदचा शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन, हार घालून सत्कार करण्यात आला. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

 

डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको

 

सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...

 

Video : देव तारी त्याला कोण मारी! कारने फरफटत नेऊनही महिला बचावली, रुग्णालयात उपचार सुरु 

 

स्वातंत्र्यदिनी दिल्या जाणाऱ्या पोलीस पदके केंद्राकडून जाहीर

टॅग्स :Policeपोलिसauto rickshawऑटो रिक्षाWomenमहिला