शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

घरातच करायचा गांजाची शेती; 'उद्योगी' तरुण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 15:38 IST

चेंबूरमधील प्रकार : गुन्हे शाखेच्या कक्ष ३ची कारवाई

मुंबई : चेंबूरमध्ये राहत्या घरातच अत्याधुनिक पद्धतीने गांजाचे उत्पादन करत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून समोर आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाकडून १ किलो गांजा आणि ५४ ग्रॅम एमडी हस्तगत करण्यात आला असून त्याच्या मित्राच्या घरातून सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ३ च्या पथकाने ही कारवाई केली आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे चेंबूर, आरसीएफ, देवनार परिसरात गस्तीवर असताना निखिल शर्मा (२६) हा संशयास्पद हालचाली करताना त्यांना आढळला. त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्याकडून २ लाख ९० हजार किमतीचा एक किलो गांजा आणि ५४ ग्रॅम एमडी आढळले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने मित्राच्या घरातच हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम या अत्याधुनिक पद्धतीने गांजाची लागवड करत उत्पादन केल्याचे समोर आले. त्यानुसार, पथकाने चेंबूरच्या माहुल गावातील पालव बागेत छापा टाकला. तेथे गांजा उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेले तीन हायड्रोपोनिक ग्रो सिमेंटचे टेंट, कुंड्या, एलईडी लाइट, टायमर यंत्रणा, पीएच सॉईल टेस्टर, आर्द्रता मापक, हायड्रोपोनिक न्युट्रियट्स, वेगवेगळ्या जातीच्या गांजाच्या बियांसह, बी उगविण्यासाठी पेपर टॉवेल अशी एकूण ६ लाखांची मालमत्ता गुन्हे शाखेने जप्त केली आहे.गांजाचे उत्पादन करणारे उच्चशिक्षित...गुन्हे शाखेने बेड्या ठोकलेला निखिल हा बीए पास असून त्याने नुकतेच अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो गेल्या ८ महिन्यांपासून गांजा विक्री करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आला. तेव्हा तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. या प्रकरणातील त्याचे अन्य दोन साथीदार पसार आहेत. त्याचा शोध सुरू असून दोघेही उच्चशिक्षित असल्याचे समजते. ते मित्रच उत्पादन करायचे. त्यासाठी लागणारे साहित्य, त्याच्या व्यवहाराची जबाबादरी निखिलवर होती.इंटरनेटवरून सर्चिंग : आरोपीने वेगवेगळ्या इंटरनेट साइटच्या माध्यमातून गांजा उत्पादनासाठी आवश्यक साहित्य, केमिकल्स, अमली पदार्थ मागविल्याचे समोर आले. इंटरनेटवरूनच त्याला गांजा उत्पादनाबाबत समजले. त्यानुसार, गुन्हे शाखा या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ