शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

हिंगोलीत पोलीस मित्रच निघाला सीरियल किलर, तपासात बिंग फुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 4:12 AM

Crime News : सेनगाव तालुक्यातील साखरा येथील भारजाबाई मारोती इंगळे (८२) या वृद्ध महिलेचा खून करून अंगावरील सोने-चांदीचे दागिने लुटत मृतदेहाजवळच असलेल्या माळरानावर अर्धवट पुरलेल्या स्थितीत आढळून आला होता.

हिंगोली : सरकारी योजनांची माहिती देण्याचा बहाणा करून  वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिचा खून करणाऱ्या सीरियल किलरला हिंगोली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा नेहमीच पोलिसांच्या अवती-भोवती राहत होता. त्यामुळे त्याच्यावर संशय येत नव्हता. मात्र, ९ एप्रिल रोजी साखरा येथील वृद्ध महिलेच्या खुनाच्या तपासात त्याचे बिंग फुटले अन् तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. दिलीप अंबादास लाटे (३२) असे या आरोपीचे नाव आहे. सेनगाव तालुक्यातील साखरा येथील भारजाबाई मारोती इंगळे (८२) या वृद्ध महिलेचा खून करून अंगावरील सोने-चांदीचे दागिने लुटत मृतदेहाजवळच असलेल्या माळरानावर अर्धवट पुरलेल्या स्थितीत आढळून आला होता. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. साखरा गावात यापूर्वीही एका वृद्ध महिलेचा खून करून तिच्या अंगावरील सोने-चांदीचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे होते. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सर्वच दिशांनी तपास सुरू केला. त्यानुसार साखरा येथीलच दिलीप अंबादास लाटे हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली