शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीची जन्मठेप कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 19:08 IST

दक्षिण गोव्यातील घटना : मात्र संशयिताला मदत करणाऱ्या पीडितेच्या आईची शिक्षा कमी

ठळक मुद्देया अत्याचारात आरोपीला साथ देणाऱ्या त्या मुलीच्या आईला ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा मात्र कमी करताना ती 12 वर्षांवर आणली. दक्षिण गोव्यातील विनेश फळदेसाई याला ठोठावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा पीठाने कायम केली.

मडगाव - एका अल्पवयीन मुलीवर सतत लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली बाल न्यायालयाने दोषी ठरवून दक्षिण गोव्यातील विनेश फळदेसाई याला ठोठावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा पीठाने कायम केली. या अत्याचारात आरोपीला साथ देणाऱ्या त्या मुलीच्या आईला ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा मात्र कमी करताना ती 12 वर्षांवर आणली.

दहा वर्षापूर्वी ही नात्यांना काळीमा फासणारी घटना दक्षिण गोव्यात घडली होती. सदर अल्पवयीन मुलीच्या विधवा आईशी आरोपीचे अनैतिक संबंध होते. आरोपी तिच्या घरी येत असताना तिच्या अल्पवयीन मुलीवरही लैंगिक अत्याचार करत असे. मुलीच्या आईला हे माहित असूनही तिच्याकडून त्याला विरोध झाला नव्हता. शेवटी त्या मुलीने आपल्या मामाच्या कानावर ही खबर घातल्यानंतर पोलिसांनी आरोपी विनेश व त्या मुलीच्या आईला अटक करुन त्यांच्यावर बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने दोघांनाही दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

दहा वर्षापूर्वी त्या मुलीच्या वडिलाचे निधन झाले होते. त्यानंतर आरोपीचे तिच्या आईशी संबंध जुळले. त्यानंतर त्या मुलीच्याही नशिबी हे भोग आले. उच्च न्यायालयात सदर मुलीच्या आईच्यावतीने बाजू मांडताना तिच्या वकिलाने मुलीच्या आईला बाल कायद्यातील कलम 8(2) लागू होत नाही असा मुद्दा उपस्थित केला होता. न्यायालयाने हा मुद्दा ग्राहय़ धरीत मुलीच्या आईची जन्मठेपेची शिक्षा रद्द करुन ती १२ वर्षांवर आणली. आतापर्यंत तिने 9 वर्षाचा कारावास भोगला आहे. त्यामुळे तिला आणखी तीन वर्षे कोठडीत काढावी लागणार आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCourtन्यायालयgoaगोवाRapeबलात्कारSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटक