हृदयद्रावक! दोन चिमुकल्यांसह पित्याची रेल्वेखाली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 18:01 IST2022-02-13T18:00:39+5:302022-02-13T18:01:02+5:30
Suicide Case : जितेंद्र दिलीप जाधव (३१, रा. बोरखेडा ता. चाळीसगाव) असे तरुणाचे नाव आहे. राज जितेंद्र जाधव (६) आणि खुशी जितेंद्र जाधव (४) अशी मुलांची नावे आहेत.

हृदयद्रावक! दोन चिमुकल्यांसह पित्याची रेल्वेखाली आत्महत्या
पाचोरा जि. जळगाव : सचखंड एक्सप्रेससमोर झोकून देत दोन चिमुकल्यांसह पित्याने आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना नगरदेवळा ता. पाचोरा रेल्वेस्थानकाजवळ रविवारी सकाळी ११ वाजता घडली.
जितेंद्र दिलीप जाधव (३१, रा. बोरखेडा ता. चाळीसगाव) असे तरुणाचे नाव आहे. राज जितेंद्र जाधव (६) आणि खुशी जितेंद्र जाधव (४) अशी मुलांची नावे आहेत. सकाळी ११ वाजता सचखंड एक्सप्रेस नगरदेवळा रेल्वे स्थानकातून जात होती. त्याचवेळी त्याने दोन मुलांसह रेल्वेसमोर स्वत:ला झोकून दिले. याबाबत एक्सप्रेसचे चालक सिंग यांनी पाचोरा पोलिसात तक्रार दिली.
घरात भांडण झाल्याने तो बोरखेड्याहून निघून आला होता. त्याच्या अंगावर मारहाण झाल्याची खुणाही आढळून आल्याचे पाचोरा पोलिसांनी सांगितले.