हृदयद्रावक! आई शेतात अन् घरात मुलाची आत्महत्या; कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 21:53 IST2021-08-30T21:51:42+5:302021-08-30T21:53:52+5:30
Suicide Case : याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हृदयद्रावक! आई शेतात अन् घरात मुलाची आत्महत्या; कारण अस्पष्ट
जळगाव : तालुक्यातील वडली येथे नितीन श्यामराव पाटील (वय २१) या तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडे चार वाजता उघडकीस आली.
नितीन याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. रांजणगाव, ता.चाळीसगाव येथील मुळ रहिवाशी असलेला नितीन, आई छायाबाई व वडील श्यामराव पाटील हे वडली येथे मामाच्या गावाला पाच वर्षापासून वास्तव्याला आले होते. गेल्या वर्षीच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. सोमवारी आई शेतात गेली होती, दुपारी घरी आली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी भाऊ तथा माजी सरपंच पांडूरंग सोनू पवार यांना घटनेची माहिती दिली. नितीन हा कंपनीत कामाला जात होता. दोन बहिणींचा एकुलता भाऊ होता. म्हसावद दूरक्षेत्राच्या पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.