शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

आरोपींच्या याचिकेवरील सुनावणी २० फेब्रुवारीपासून, शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 6:19 AM

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना ज्या तरतुदीअंतर्गत फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली त्या तरतुदीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी २० फेब्रुवारीपासून सुरू करू, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.

मुंबई  - शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना ज्या तरतुदीअंतर्गत फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली त्या तरतुदीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी २० फेब्रुवारीपासून सुरू करू, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.एका फोटो जर्नलिस्टवर बलात्कार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने ५ एप्रिल २०१४ रोजी विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी यांना फाशीची शिक्षा ठोठावली.आरोपींनी २०१४मध्ये दाखल केलेली याचिका अजूनही प्रलंबित आहे, असे म्हणत न्या. बी.पी. धर्माधिकारी व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारने मागितलेली मुदतवाढ देण्यास नकार दिला.ही याचिका २०१४ पासून प्रलंबित आहे. त्यामुळे तुम्हाला (केंद्र आणि राज्य सरकार) तयारी करण्यासाठी भरपूर वेळ उपलब्ध होता. या याचिकेच्या निकालावर फाशीच्या शिक्षेला आव्हान देणाºया याचिकांवरील सुनावणी अवलंबून असल्याने त्या याचिकांवरील सुनावणीस स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आणखी विलंब न करता या तीन याचिकांवर २० फेब्रुवारीपासून सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले.निर्भया प्रकरणानंतर केंद्र सरकारने सीआरपीसीमधील काही तरतुदींमध्ये सुधारणा केली. बलात्कारासारखा गुन्हा दोनदा करणाºयांना सीआरपीसी ३७६(ई)अंतर्गत फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. याअंतर्गत शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकणातील आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र, खटल्याच्या सुरु वातीला हे कलम न लावता खटल्याचे काम मध्यावर आले असताना हे कलम लावण्यात आले. त्यामुळे आरोपींनी या कलमाच्या वैधतेलाच उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयMumbaiमुंबई