आई, भाऊ आणि बहिणीची हत्या करून पोलीस ठाण्यात गेला, म्हणाला...; तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 20:05 IST2026-01-05T20:03:36+5:302026-01-05T20:05:10+5:30
Delhi Crime News: देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. एका तरुणाने आई, भाऊ आणि बहिणीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊन ही माहिती दिली.

आई, भाऊ आणि बहिणीची हत्या करून पोलीस ठाण्यात गेला, म्हणाला...; तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली
Delhi Crime Latest News: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरात घडलेल्या घटनेने पोलीसही हादरले. एका तरुणाने त्याची आई, भाऊ आणि बहीण या तिघांची हत्या केली. यशवीर असे या तरुणाचे नाव आहे. तिघांची हत्या केल्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर त्याचे मन बदलले आणि तो पोलीस ठाण्यात गेला. आत्मसमर्पण करत त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस यशवीरच्या घरी आले तेव्हा तेथील दृश्य बघून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही घाम फुटला.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने त्याचा १२ वर्षाचा भाऊ, २६ वर्षांची बहीण आणि ४५ वर्षाच्या आईची हत्या केली. आरोपीने त्यांना आधी गुंगी येणारा पदार्थ खाऊ घातला. तिघेही बेशुद्ध झाल्यानंतर एकापाठोपाठ एक तिघांची मफलरने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, तो अयशस्वी ठरल्यानंतर यशवीर पोलीस ठाण्यात पोहोचला.
घटना ऐकून पोलीस चक्रावले
तिघांची हत्या केल्यानंतर यशवीर लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गेला. तिथे त्याने पोलिसांना सांगितले की, मी आई, बहीण आणि भावाची हत्या केली आहे. हे ऐकून पोलीस हादरले. पोलिसांनी त्याच्याकडून माहिती घेतली आणि त्याच्या घरी पोहचले.
घरात मिळाले तिघांचे मृतदेह
पोलिसांनी घर उघडले आणि आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश करताच पोलिसही हादरले. तिथे तिघांचे मृतदेह पडलेले होते. घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती.
अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक धानिया यांनी सांगितले की, आरोपी यशवीर यानेच पोलीस ठाण्यात येऊन तिघांची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांना घरात तिघांचे मृतदेह मिळाले. मृतदेह आरोपीच्या आई, बहीण आणि भावाचे आहेत.
आरोपीने तिघांची हत्या का केली?
पोलिसांनी आरोपीची चौकशी केली, त्यात त्याने हत्येच्या कारणाबद्दलही सांगितले. आरोपी यशवीरने अनेकांकडून कर्ज घेतले होते. ते फेडणे त्याला अशक्य झाले होते. कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे यशवीर तणावाखाली होता. त्यातच त्याने आई, भाऊ आणि बहीण यांची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याचे धानिया यांनी सांगितले.