शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ एक कॉल लावतोय सर्वांना कामाला...; पोलिसांकडून कडक कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 05:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : साहेब, बॉम्बब्लास्ट होणार... गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या कॉलने मुंबई पोलिसांची दमछाक वाढवली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : साहेब, बॉम्बब्लास्ट होणार... गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या कॉलने मुंबई पोलिसांची दमछाक वाढवली आहे. त्यामुळे अशाप्रकारे कॉल करून खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी दिला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये १८ हॉक्स कॉल करण्यात आले. २०२२ मध्ये हाच आकडा १५ होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांत ११ खोट्या कॉलची भर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात पडली. बहुतांश  कॉल हे दारूच्या नशेत किंवा मानसिक स्थिती ठीक नसलेल्यांकडून येत आहेत. गेल्या काही दिवसांत आलेल्या कॉलमध्ये दारूच्या नशेत, राग किंवा बदला घेण्याच्या भावनेतून कॉलचे प्रमाण वाढत आहे. मात्र, इथून पुढे अशाप्रकारे फोन करून खोटी माहिती देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत थेट अटकेची कारवाई करण्यात येईल, असेही सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले. 

सह पोलिस आयुक्तांनाही कॉल  वाहतूक शाखेचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांना थेट अनोळखी व्यक्तीने कॉल करून मीरा भाईंदर येथे बॉम्बस्फोट होणार असून, पोलिस पाठवा असा कॉल केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने आपण आमदार यशवंत माने असून, मीरा-भाईंदर येथे बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली होती. त्याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. 

अशी होते धावपळ.. नियंत्रण कक्षात कॉल येताच तत्काळ संबंधित पोलिस ठाण्यासह बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथकासह सर्व यंत्रणांना याची माहिती दिली. संबंधित परिसर रिकामा करून  तपासणी केली जाते. कॉल खोटा असल्याची खात्री होत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी शेकडो मनुष्यबळ कामाला लागते. त्यामध्ये काही न आढळल्यास कॉलधारकाचा शोध  घेण्यास अतिरिक्त यंत्रणावर ताण वाढतो.

काय कारणे ? आतापर्यंतच्या समोर आलेल्या घटनांमध्ये दारूच्या नशेत मित्राला, नातेवाइकाला धडा शिकविण्यासाठी खोटे कॉल केल्याचे दिसून आले, तर काही प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी तिच्या पतीला दहशतवादी असल्याचे भासवले, तर मानसिक ताणतणाव, खोडसाळपणा तसेच पोलिसांना कामाला लावण्यासाठी कॉलची भर पडत असल्याचे वेगवगेळ्या कारवाईतून समोर आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी