लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 19:50 IST2025-11-09T19:48:45+5:302025-11-09T19:50:38+5:30
Minor Girl Raped by Brother: 21 वर्षीय तरुणाने त्याच्या लहान बहिणीला बळजबरी नातेसंबंध ठेवायला भाग पाडले. तिच्यासोबत अनेक महिने जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. तरुणीला पाठदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर या अत्याचाराला वाच्या फुटली.

लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
Girl Raped by Brother: एक चिंताजनक घटना समोर आली आहे. एका वर्षीय २१ तरुणाने अल्पवयीन बहिणीला त्याच्यासोबत जबरदस्तीने रिलेशनशिप ठेवण्यास भाग पाडले. इतकेच नाही, तर गेल्या काही महिन्यांपासून तो तिच्यासोबत बळजबरी शारीरिक संबंधही ठेवत होता. आपण लग्न करू असे तो त्याच्या बहिणीला म्हणत होता. तरुणीने याबद्दल घरच्यांना सांगणार आहे, असे म्हटल्यानंतर त्याने मी जीव देईन अशी धमकी देत अत्याचार सुरू ठेवले. पण, जेव्हा पीडित तरुणीला पाठदुखीचा त्रास सुरू झाला, त्यानंतर ही भावाकडून सुरू असलेले अत्याचार समोर आले.
कर्नाटकातील कोप्पलमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना ३० ऑक्टोबर रोजी उजेडात आली, जेव्हा मुलीने शासकीय रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. गर्भवती असल्याचे दिला माहिती नव्हते. पाठदुखीचा प्रचंड त्रास सुरू झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच रात्री तिने बाळाला जन्म दिला आणि हे प्रकरण समोर आले.
भावाने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली
पीडित तरुणीने रुग्णालय प्रशासनाला दिलेल्या तक्रारीत सांगितले की, तिच्या भावाने बळजबरी शारीरिक संबंध ठेवण्यास बळजबरी केली. फेब्रुवारीमध्ये शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर तो म्हणाला की आपण लग्न करू आणि मी तुझी काळजी घेईन.
घरचे आणि समाजातील लोक हे स्वीकारणार नाही, याबद्दल ती भावाला बोलली आणि त्याला असे करण्यास विरोध केला. पण, त्याने जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवणे कायम ठेवले.
घरच्यांशी बोलते म्हणाल्यावर...
पीडितेने सांगितले की, भाऊ ब्लॅकमेल करत होता आणि आत्महत्या करेन अशा धमक्या देत होता. मी जेव्हा म्हणाले की, याबद्दल घरच्यांशी बोलते, तेव्हा तो म्हणाला की मी जीव देईन.
पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणीचे दुसरे लग्न झाले आहे. तो पीडित मुलगी आणि दोन मुलांसह राहत होता. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी २१ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.