शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

Hathras Gangrape : कडक बंदोबस्तात पीडितेचे कुटुंबीय सुनावणीसाठी लखनऊ झाले रवाना

By पूनम अपराज | Published: October 12, 2020 2:07 PM

Hathras Gangrape : पीडितेच्या कुटूंबाच्या घरापासून कडक सुरक्षेमध्ये हाथरसमधून तपास यंत्रणांच्या ताफासह पिडीतेचे कुटुंब लखनऊला रवाना झाले.

ठळक मुद्देसामुहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतर हाथरसमध्ये पोलिसांचा फौजफाटा ठेवत वाद ओढवून घेतलेल्या उत्तर प्रदेश सरकारने अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे.

उत्तर प्रदेशच्याहाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात आज होणार आहे. कडक सुरक्षेत पीडितेचे कुटुंब न्यायालयात हजर राहणार आहे. यासह कोर्टाने या प्रकरणातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही समन्स बजावले आहे. पीडितेच्या कुटूंबाच्या घरापासून कडक सुरक्षेमध्ये हाथरसमधून तपास यंत्रणांच्या ताफासह पिडीतेचे कुटुंब लखनऊला रवाना झाले. त्यांच्यासह सीओ आणि मॅजिस्ट्रेट देखील असून आजचा दिवस महत्वाचा आहे. सीबीआय देखील याप्रकरणी तपासात सक्रिय झालं आहे. सामुहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतर हाथरसमध्ये पोलिसांचा फौजफाटा ठेवत वाद ओढवून घेतलेल्या उत्तर प्रदेश सरकारने अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. यावर सीबीआयने सूत्रे हाती घेत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तपासासाठी टीम बनविली आहे. सीबीआयने एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. या आधी पीडितेच्या भावाने हाथरसच्या चंदपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 14 सप्टेंबरला आरोपीने त्याच्या बहिणीचा बाजरीच्या शेतामध्ये गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप पीडितेच्या भावाने केला होता.बलात्काराच्या घटनेला 27 दिवस झाले आहेत. आधी हाथरस पोलीस नंतर एसआयटी व आता सीबीआय असा तपास होत आहे. सध्या याची चौकशी एसआयटी करत होती. 14 सप्टेंबरला एसआयटी स्थापन करण्य़ात आली होती. त्यांनी गावातील 40 लोकांची चौकशी केली होती. हे लोक घटनेच्या वेळी आजुबाजुच्या शेतात काम करत होते. यामध्ये आरोपी आणि पीडितेचे कुटुंबही आहेत. दरम्य़ान हाथरस पीडितेचे कुटुंबीय लखनऊला जात आहेत. उत्तर प्रदेशपोलिसांची टीम त्यांना घेऊन जात आहे. सुनावणीसाठी पीडितेच्या घरातील ५ जण आणि काही नातेवाईक जाणार आहेत. डीआयजी शलभ माथूर यांनी पीडितेच्या गावी जाऊन परिस्थीतीची पाहणी केली. 1 ऑक्टोबरला अलाहाबाद न्यायालयाने राज्याच्या सचिवांसह मोठ्या अधिकाऱ्यांसह हाथरसचे जिल्हाधिकारी यांना बोलावले होते. 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग