शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

'सॉरी ... मला माहित नव्हतं यात कोरोनाच्या लसी आहेत'; पेपरवर लिहून चोरानं परत केल्या लसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 20:57 IST

जिंद येथील सिव्हिल रुग्णालयातून बुधवारी रात्री चोरी झाल्या होत्या लसी.

ठळक मुद्देजिंद येथील सिव्हिल रुग्णालयातून बुधवारी रात्री चोरी झाल्या होत्या लसी.सध्या अधिक तपास सुरू.

हरयाणातील जिंद येथे सिव्हिल रुग्णालयातून एक अजब प्रकार समोर आला आहे. बुधवारी रात्री या रुग्णालयातून रात्री १२ वाजता एका चोरानं कोरोनाच्या लसी चोरल्या होत्या परंतु दुसऱ्याच दिवशी गुरूवारी त्या चोरानं सिव्हिल लाईन पोलीस स्थानकाबाहेर असलेल्या एका चहावाल्याकडे या लसी परत केल्या. तसंच त्याच्यासोबत एक संदेश लिहिलेला पेपरही दिला. त्यावर 'सॉरी मला माहित नव्हतं या कोरोनाच्या लसी आहेत,' असं यावर लिहिण्यात आलं होतं."बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास जिंद येथील सिव्हिल रुग्णालयातून कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे काही डोस चोरीला गेले होती. परंतु गुरुवारी सकाळी १२ वाजता सिव्हिव लाईन पोलीस स्थानकाबाहेर असलेल्या चहावाल्याकडे बसलेल्या एका वृद्धाकडे तो चोर पोहोचला. त्याच्या हातात एक पिशवी होती. त्यानं ती पिशवी वृद्ध व्यक्तीला देत त्यात पोलीसासाठी आणलेलं जेवण असल्याचं सांगितलं आणि त्यानं पळ ठोकला." अशी माहिती जिंग पोलीसचे डिएसपी जितेंद्र खटकड यांनी दिली. वृद्ध व्यक्तीनं जेव्हा ती पिशवी पोलिसांना दिली तेव्हा त्यांना त्यात कोविशिल्ड लसीच्या १८२ वाईल आणि कोवॅक्सिनचे ४४० डोस दिसून आले. तसंच त्याच्यासोबत एक पत्रही सापडलं. त्यात 'सॉरी मला माहित नव्हचं यात कोरोनाच्या लसी आहेत,' असा संदेशही लिहिला असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, चोराला रेमडेसिवीर चोरायची होती परंतु त्यानं कोरोनाच्या लसी चोरल्या असतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. अद्याप त्या चोराची कोणतीही माहिती मिळाली नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHaryanaहरयाणाhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस