खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 19:15 IST2025-11-22T19:14:17+5:302025-11-22T19:15:02+5:30
गुजरात वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या पत्नी आणि दोन मुलांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

फोटो - आजतक
गुजरात वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या पत्नी आणि दोन मुलांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अधिकाऱ्याचे जवळपास चार वर्षांपासून एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरबद्दल खूप सीरियस असल्याचं म्हटलं जातं.
शैलेश खंभाला असं या सहाय्यक वनसंरक्षकाचं नाव आहे. २०२२ मध्ये त्याची एका महिला वन अधिकाऱ्याशी मैत्री केली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मात्र महिलेचा देखील या गुन्ह्यात सहभाग होता की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणाता आता त्या महिलेची चौकशी करत आहेत.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, २० नोव्हेंबर रोजी इन्स्पेक्टर एनएच कुरेशी म्हणाले, प्राथमिक तपासानुसार कुटुंबाची हत्या करण्यामागचं कारण हे एका महिला कर्मचाऱ्यासोबतचे प्रेमसंबंध होतं. या हत्येत महिलेचा सहभाग होता का याचा तपास करत आहोत. आम्ही महिलेची चौकशी केली आहे, परंतु तिने शैलेशच्या या प्लॅनची काहीच माहिती नव्हती असं सांगितलं.
सूरत येथील रहिवासी शैलेश खंभाला याने ७ नोव्हेंबर रोजी त्याची पत्नी आणि मुलं बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी खूप शोध घेतला, परंतु ते सापडले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे पुढे तपासात असं आढळून आलं की, शैलेशने त्याची पत्नी नयना, १३ वर्षांची मुलगी आणि ९ वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे.
भारतनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यात असा आरोप आहे की, शैलेश खंभालाने ५ नोव्हेंबर रोजी पत्नी आणि मुलांच्या तोंडावर उशी ठेवून गळा दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने मृतदेह सहा फूट खोल खड्ड्यात पुरला आणि त्यावर दगड ठेवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.