शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
2
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
3
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
4
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
5
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
6
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
7
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
8
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
9
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
10
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
11
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
12
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
13
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
14
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
15
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
16
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
17
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
18
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
19
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
20
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील ग्रीन लिफ हॉटेलात एका टोळक्याकडून मुलींना मारहाण

By सदानंद नाईक | Updated: October 16, 2023 21:37 IST

सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-४, लालचक्की परिसरातील ग्रीन लिफ हॉटेलात दोन मुलीची छेड काढून मारहाण केल्याची घटना उघड झाली. या ...

सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-४, लालचक्की परिसरातील ग्रीन लिफ हॉटेलात दोन मुलीची छेड काढून मारहाण केल्याची घटना उघड झाली. या प्रकरणी चौघावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तिघांना अटक केल्यावर त्यांची वैयक्तीक जामिनावर सुटका झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.

उल्हासनगर लालचक्की चौक येथील ग्रीन लिफ हॉटेल मध्ये ११ ऑक्टोबर रोजी योगीता ही मुलगी आपल्या मावस बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाऊ व बहिणीच्या मुलासह गेली होती. हॉटेल मधील त्यांच्या टेबला समोरच्या टेबलवर तोंड ओळखीचा आकाश नावाचा मुलगा मित्रा सोबत बसला होता. यातील आकाश याने त्या दोघी बहिणीकडे अश्लिल हावभाव करुन तुझा मोबाईल नंबर दे असे बोलुन खुणावत होता. याबाबत मुलींनी हॉटेल व्यवस्थापकाला सांगून टेबल बदली करण्यास सांगितल्यावर, व्यवस्थापकाने मुलांना समज दिली. मात्र त्यानंतरही त्यांचे अश्लील हावभाव सुरू होते. तेव्हा योगीताच्या बहिणीने आक्षेप घेतल्यावर, आकाशने चिडुन जातीवाचक शिवीगाळ करीत दोघीही बहिणीला मारहाण केली. मारहाणीत बहिणीच्या डोक्याला मार लागुन कानाचा पडदा फाटला आहे. 

विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात योगीताने तक्रारीवरून पोलिसानी भांदवी कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ५०९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या आदेशानुसार आकाशसह तीन गुंडांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर ५ हजार वैयक्तिक टेबल जामिनावर सुटका केली. अटक होऊन मुलांची सुटका झाल्याने, मुलींनी त्यांच्यापासून जीवाला भीती असल्याचे म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलिस  निरीक्षक कोकरे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी