गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंड बदला, एक्स बॉयफ्रेंडने 2 तरुणांची हत्या करून मृतदेह पुरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 21:43 IST2022-02-01T21:42:48+5:302022-02-01T21:43:35+5:30

Double Murder Case : दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली आहे.

Girlfriend changes boyfriend, ex boyfriend kills 2 boys and buries dead | गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंड बदला, एक्स बॉयफ्रेंडने 2 तरुणांची हत्या करून मृतदेह पुरला

गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंड बदला, एक्स बॉयफ्रेंडने 2 तरुणांची हत्या करून मृतदेह पुरला

गोरखपूर: उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील झांघा परिसरात दोन अल्पवयीन मुलांची हत्या करून त्यांचे मृतदेह पुरण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता प्रेमप्रकरणातून दोन्ही तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले. 

मारेकऱ्याचे गावातीलच एका मुलीवर प्रेम असल्याचे तपासात उघड झाले आहे. मात्र काही महिन्यांनी त्या मुलीने प्रियकर बदलला आणि मयत आकाशच्या प्रेमात पडली. याचा राग येऊन मारेकऱ्याने आधी आकाशचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. त्याचवेळी मागून मृताचा मित्र गणेश आला असता त्यानेही त्याला मारले. त्यांची हत्या केल्यानंतर दोघांचे मृतदेह जवळच्या खड्ड्यात पुरण्यात आले. पोलिसांनी मारेकऱ्याला आणि त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राला ताब्यात घेतले आहे. दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झांघा परिसरात राहणारे आकाश जैस्वाल आणि गणेश जैस्वाल हे १० जानेवारीच्या संध्याकाळपासून बेपत्ता होते. 25 जानेवारी रोजी दुपारी दोघांचेही मृतदेह गावाबाहेरील खड्ड्यात आढळून आले. त्यांचे दोन्ही हात बांधलेले असून डोक्यावर जखमेच्या खुणा होत्या. तेथून एक मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी मोबाईलचा सीडीआर काढून फॉरेन्सिकसाठी पाठवला आहे. मृताच्या मोबाईलवरून मिळालेल्या नंबरच्या आधारे मारेकऱ्याला पकडणे पोलिसांना सोपे झाले. पहिल्या दिवसापासून पोलिसांमध्ये प्रेमप्रकरणातून खून झाल्याची चर्चा होती. पोस्टमॉर्टममध्ये १५ दिवसांपूर्वी जड वस्तूने वार केल्याने खून झाल्याचे समोर आले.

Web Title: Girlfriend changes boyfriend, ex boyfriend kills 2 boys and buries dead