१५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये, 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशीच गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे कारमध्ये मिळाले मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 16:44 IST2026-02-14T16:42:51+5:302026-02-14T16:44:36+5:30
रिलेशनशिपमध्ये असलेल्या दिल्लीतील एका जोडप्याचा मृतदेह नोएडात कारमध्ये मिळाला. दोघांचा मृत्यू गोळी लागून झाला आहे. ही घटना समोर येताच खळबळ उडाली.

१५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये, 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशीच गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे कारमध्ये मिळाले मृतदेह
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नोएडामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारमध्ये एका तरुणीचा आणि तरुणाचा मृतदेह मिळाला. दोघांचाही डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीतून दोघेही मागील १५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने आधी त्याच्या गर्लफ्रेंडला गोळ्या घालून मारले आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळावरून रिव्हॉल्वर, रिकामी काडतुसे जप्त केली आहेत.
Noida, Uttar Pradesh: A man shot his girlfriend and then shot himself inside a car, resulting in their deaths on the spot. A pistol and cartridges were recovered from the scene. The deceased man and woman are said to be residents of Trilokpuri, Delhi. Police reached the spot,… pic.twitter.com/hwfudHh1cX
— IANS (@ians_india) February 14, 2026
मृत्यू झालेली तरुणी आणि तरुण कोण?
पोलिसांनी सांगितले की, मयत तरुणीचे नाव रेखा आहे. ती नोएडा सेक्टर ५८ पोलीस ठाणे हद्दीत राहत होती. मयत तरुणाचे नाव सुमीत आहे. तो दिल्लीतील त्रिलोकपुरी येथे राहत होता. दोघेही खूप वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. कारमधील मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले. घटनास्थळी मिळाले पुराव्यांचा पोलीस तपास करत आहेत. रेखा आणि सुमीत मागील १५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.