गँगरेप करून मुलीला फेकले विहिरीत; रात्रभर तेथे पडून होती अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 21:41 IST2021-05-24T21:36:01+5:302021-05-24T21:41:50+5:30

Gangrape : रविवारी पहाटे ही मुलगी विहिरीत जिवंत आढळल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

The girl was gang-raped and thrown into a well; She was lying there whole night ... | गँगरेप करून मुलीला फेकले विहिरीत; रात्रभर तेथे पडून होती अन्... 

गँगरेप करून मुलीला फेकले विहिरीत; रात्रभर तेथे पडून होती अन्... 

ठळक मुद्देएका मुलीवर गुंडांनी बलात्कार केला. यानंतर तिला विहिरीत फेकण्यात आले.

करौली - राजस्थानात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत आहे. त्याचबरोबर बलात्कारासारखे गंभीर गुन्हे थांबण्याचे नाव घेत नाहीत. जे लोक असे निर्दय गुन्हे करतात ते निर्दयीपणाची प्रत्येक मर्यादा ओलांडताना दिसत आहेत. शनिवारी राज्यातील करौली जिल्ह्यातील कैलादेवी परिसरातील एका गावात सामूहिक बलात्काराचे असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे एका मुलीवर गुंडांनी बलात्कार केला. यानंतर तिला विहिरीत फेकण्यात आले. रविवारी पहाटे ही मुलगी विहिरीत जिवंत आढळल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मुलगी बकरी चरत होती
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी कैलादेवी विभागातील खेड्यात शेळ्या चरायला घेऊन गेली होती. असा आरोप आहे की, गावातील तीन मुलांनी तिला पळवून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला विहिरीत फेकण्यात आले. विहीर पावसाच्या पाण्याने भरली होती. रात्रभर मुलगी बेशुद्ध अवस्थेत विहिरीत पडली होती. इकडे संध्याकाळी मुलगी घरात पोहोचली नाही, तेव्हा कुटुंबिय इकडे-तिकडे शोधत राहिले.



पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला
सकाळी विहिरीतुन ओरडण्याचा आवाज ऐकताच ग्रामस्थांनी तिला बाहेर काढले. जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. कुटुंबीयांच्या वतीने पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी सदर युवतीला रुग्णवाहिकेतून करौली रुग्णालयात आणले आणि वैद्यकीय चाचणी केली. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित चौकशीही केली जात आहे. लवकरच आरोपी पोलिसांना अटक केली जाईल. 

Web Title: The girl was gang-raped and thrown into a well; She was lying there whole night ...