प्रियकराच्या मदतीने मुलीने केला पित्याचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 04:52 IST2020-01-24T04:51:17+5:302020-01-24T04:52:05+5:30

सातारा तालुक्यातील एका गावामध्ये प्रियकराच्या मदतीने अल्पवयीन मुलीने दिव्यांग वडिलांचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली.

Girl murdered father with help of boyfriend | प्रियकराच्या मदतीने मुलीने केला पित्याचा खून

प्रियकराच्या मदतीने मुलीने केला पित्याचा खून

सातारा : सातारा तालुक्यातील एका गावामध्ये प्रियकराच्या मदतीने अल्पवयीन मुलीने दिव्यांग वडिलांचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गुन्हा करणारे दोघेही अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
खून झालेल्या दिव्यांग इसमास एक मुलगा व मुलगी आहे. त्यांची पत्नी १५ वर्षांपासून बेपत्ता आहे. तर त्यांचा मुलगा बुधवारी बाहेरगावी गेला होता. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुलीने प्रियकराच्या मदतीने आपल्या वडिलाचा गळा स्कार्प आणि जर्कीनच्या लेसने आवळला. यामध्ये वडिलाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी पोलिसांना माहिती समजली. त्यानंतर गुन्हा नोंद केला. याप्रकरणी मृताच्या नातेवाइकाने तक्रार दिली आहे.

Web Title: Girl murdered father with help of boyfriend