नगराध्यक्षाच्या कारच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 21:50 IST2019-03-11T21:47:16+5:302019-03-11T21:50:52+5:30

ही कार मलकापूरचे नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिश रावळ यांच्या मालकीची आहे. 

The girl killed in the car accident | नगराध्यक्षाच्या कारच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

नगराध्यक्षाच्या कारच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

ठळक मुद्देमलकापुरचे नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ हे आपल्या स्विफ्ट डिझायर क्र. एम एच २७ एसी ३३०७ या कारने ड्रायवर प्रदिप जैन समवेत बुलढाणाकडे जात होते.याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला चालक प्रदिप जैन याला सोबत घेवून नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिश रावळ स्वत: हजर झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला नव्हता. 

मलकापुर - कारच्या धडकेत १० वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुलढाणा रोड वरील दाताळा शेलापुर दरम्यान किरण पेपर मिल नजीक सायंकाळी ५ वाजता घडली. ही कार मलकापूरचे नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिश रावळ यांच्या मालकीची आहे. 

मलकापुरचे नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ हे आपल्या स्विफ्ट डिझायर क्र. एम एच २७ एसी ३३०७ या कारने ड्रायवर प्रदिप जैन समवेत बुलढाणाकडे जात होते. दाताळा नजीक किरण पेपर मिल मध्ये कार्यरत असलेले अनंत बोरले हे त्यांची पत्नी आणि १० वर्षीय मुलगी कल्याणी समवेत पेपर मिल जवळ उभे होते. त्याच वेळी समोरून कुल्फीची हातगाडी येत असताना कल्याणी आई वडिलाचा  हात सोडून कुल्फी घेण्यासाठी रस्त्याच्या दुसºया बाजूला धावत सुटली. तेवढ्यात तीला कारची धडक लागली. या धडकेत ती गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी अवस्थेत मुलीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला चालक प्रदिप जैन याला सोबत घेवून नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिश रावळ स्वत: हजर झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला नव्हता. 

Web Title: The girl killed in the car accident