कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 23:48 IST2025-12-15T23:48:08+5:302025-12-15T23:48:34+5:30
विरारच्या सम्यक चव्हाण खुनाच्या गुन्हात तपासासाठी पोलिसांकडे ताबा

कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: भारतसह नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश व दुबई व इतर देशात नेटवर्क असलेला तसेच विरार पोलीस ठाण्यात २०२२ साली खून हत्या व त्याचा कट रचणे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात कुख्यात आरोपी सुभाषसिंह शोभनाथ ठाकूर यांचा ताबा मिरा भाईंदर गुन्हे शाखा - १ पोलिसांनी फतेगढ जेलमधून न्यायालयाच्या आदेशाने घेऊन उत्तरप्रदेश एसटीएफ पोलिसांच्या बंदोबस्तात लखनऊ एअरपोर्टवर आणण्यात आले व तेथून मुंबई विमानतळावर आणून मिरा भाईंदर मध्ये पोलीस बंदोबस्तात आणण्यात येणार आहे. ठाण्याच्या मकोका न्यायालयात हजर केले जाणार आहे. ह्यापूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनीही एक पथक सुभाषसिंह यांचा ताबा घेण्यासाठी पाठवले होते, मात्र त्यावेळी त्याची तब्येत खालावली होती म्हणून ताबा देता आला नव्हता. मात्र आता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताबा घेतला आहे.
विरार पोलीस ठाण्यात २०२२ साली दाखल गुन्ह्यात कट कारस्थान रचण्यात सक्रिय सहभाग व सदरील हत्येचा कट रचनारा असल्याचे आढळून आल्याने आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे, मात्र प्लॅनर म्हणून सुभाषसिंह ठाकूर ह्याला १४ वा आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली आहे. तर २०१५ साली बंटी प्रधान खुनाच्या गुन्हात सुद्धा सहभाग आहे का हे सुद्धा तपासले जाणार आहे. ठाकूर गँगने बऱ्याच लोकांकडून खंडणी गोळा केली असून बऱ्याच जमिनीच्या व्हवहारात जबरदस्तीने मध्यस्थी करून व्यवहार सेंटलमेंट केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुभाषसिंह ठाकूरला १९९३ सालच्या जेजे रुग्णालय हत्याकांडातील मुख्य आरोपी म्हणून विशेष टाडा न्यायालयाने आजन्म करावासाची शिक्षा ठोठावली होती. तो फतेगढ कारागृहात शिक्षा भोगत आहे.
कुख्यात सुभाषसिंह ठाकूरला मंगळवारी कोर्टात हजर करून त्याची पोलीस कोठडी घेऊन पुढील तपास करणार आहेत.