उत्तर प्रदेशात खळबळ! आजारी आईला पाहायला रुग्णालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीवर केला सामूहिक बलात्कार
By पूनम अपराज | Updated: October 16, 2020 21:12 IST2020-10-16T21:12:14+5:302020-10-16T21:12:55+5:30
Gangrape : शहरातील एका गावात राहणार्या 15 वर्षाच्या मुलीच्या आईची तब्येत बुधवारी रात्री बिघडली होती.

उत्तर प्रदेशात खळबळ! आजारी आईला पाहायला रुग्णालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीवर केला सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेशात महिला आणि अल्पवयीन मुली यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हाथरसानंतर आता जालौन जिल्ह्यातील उरई येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. काल रात्री आजारी पडलेल्या आईला रुग्णालयात पाहण्यासाठी जात असलेल्या अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी जंगलाच्या पाठीमागे सामूहिक बलात्कार केला. शहरातील एका गावात राहणार्या 15 वर्षाच्या मुलीच्या आईची तब्येत बुधवारी रात्री बिघडली होती.
त्यानंतर वडिलांनी तिच्या आईला जिल्हा रुग्णालयात नेले. रूग्णालयात गेलेल्या आई-वडिलांना पाहण्यासाठी मुलगीसुद्धा रात्री बाराच्या सुमारास पायी हॉस्पिटलकडे जात होती, मात्र ती शहीद भगतसिंग चौकातून रुग्णालयात न जात घरी परतली. त्यानंतरच, टाउन हॉलजवळ एकट्या अल्पवयीन मुलीला पाहिल्यानंतर दोन तरुण तिच्यामागे गेले आणि काही अंतरानंतर दोघांनीही तिला पकडले आणि धमकावले. त्यानंतर तिला जंगलाच्या पाठीमागे नेऊन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
यानंतर अल्पवयीन मुलगी घरी पोहोचली आणि कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. पोलिसांना या प्रकरणाची माहितीही देण्यात आली. कोतवाल जेपी पाल यांनी सांगितले की, या अल्पवयीन कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसांनी एका आरोपीला पकडले आहे.