लग्न सोहळ्यानंतर आणखी काम मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेवर गँगरेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 21:34 IST2021-04-27T21:34:06+5:302021-04-27T21:34:45+5:30
Gangrape : रविवारी रात्री उशिरा हा लाजिरवाणा प्रकार घडल्यानंतर तिला गंभीर अवस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी पसार झाले.

लग्न सोहळ्यानंतर आणखी काम मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेवर गँगरेप
आग्य्रात विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्न सोहळ्यात जेवण बनवणाऱ्या मदतनीस महिलेवर कॅटररसह पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. रविवारी रात्री उशिरा हा लाजिरवाणा प्रकार घडल्यानंतर तिला गंभीर अवस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी पसार झाले.
बरहन पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या पतीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन महिलेची वैद्यकीय तपासणी केली. तिला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे. आग्रा ग्रामीण पोलीस अधीक्षक सत्यजीत गुप्ता या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
लग्न सोहळ्यानंतर आणखी काम मिळवून देण्याच्या आमिषाने कॅटरर आणि एका व्यक्तीने पीडित महिलेला निर्जनस्थळी नेले. तिथे तिघेजण आधीच उपस्थित होते. त्यानंतर पाच जणांनी मिळून तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने पोलिसात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. पीडित महिला समारंभांमध्ये जेवण बनवण्यासाठी मदतनीस म्हणून काम करते. आग्र्यातील एका लग्न सोहळ्यात पुरी तळण्याच्या कामासाठी पीडित महिला गेली होती.