शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:25 IST

पोलिसांनी तपास करून वधूला शोधून काढलं. चौकशीदरम्यान वधूबद्दलचं असं सत्य उघड झालं की सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पत्नीचं मंदिराबाहेरून अपहरण झाल्याची पोलिसांना माहिती दिली. त्याचं आजच लग्न झालं होतं आणि तो त्याच्या वधूसोबत सप्तपदी घेतल्यावर बाहेर आला तेव्हा काही लोकांनी त्याच्या पत्नीचं अपहरण केलं.  दिवसाढवळ्या एका वधूचं अपहरण झाल्याची माहिती समजल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी तपास करून वधूला शोधून काढलं. चौकशीदरम्यान वधूबद्दलचं असं सत्य उघड झालं की सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या वधूच्या अपहरणाची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती ती सामान्य वधू नव्हती तर लग्नाच्या नावाखाली लोकांना लुटणारी वधू होती. गुलशाना रियाज खान नावाची ही वधू गुजरातमध्ये काजल, हरियाणात सीमा, बिहारमध्ये नेहा आणि उत्तर प्रदेशात स्वीटी झाली होती. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी तिने १२ लग्नं केली. तिच्या या गँगमध्ये पुरुष आणि महिलाही होते. 

ही गँग लग्नासाठी वधू शोधत असलेल्या कुटुंबीयांचा शोध घ्यायचे. ते मुलीचा फोटो दाखवून लग्न ठरवायचे. नंतर लग्नासाठी पैसे मागायचे. लग्न झाल्यानंतर हे लोक मुद्दाम नवरीचं अपहरण झाल्याचं नाटक करायचे आणि पळून जायचे. गुलशाना आणि तिच्या गँगने अनेक राज्यांमध्ये लग्नाचं जाळं पसरवलं. तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी मॅट्रिमोनियल साइट्स आणि सोशल मीडियाचाही वापर केला.

पोलिस चौकशीत असंही उघड झालं की गुलशाना विवाहित आहे आणि तिच्या खऱ्या नवऱ्याचं नाव रियाज खान आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी रियाज खान हा शिंपी आहे, पण त्याला गुलशानाचे सर्व कारनामे माहित आहेत.  हरियाणातील रोहतक येथील रहिवासी सोनूची ८०,००० रुपयांची फसवणूक केल्यानंतर पोलिसांनी या गँगचा पर्दाफाश केला. 

लग्नानंतर वधूचं अपहरण झाल्यानंतर, सोनूने यूपी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. आंबेडकर नगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संपूर्ण गँगला पकडलं. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहनलाल, रतनकुमार सरोज, रंजन उर्फ ​​आशु गौतम, मंजू माळी, राहुल राज, सन्नो उर्फ ​​सुनीता, पूनम आणि रुखसार यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ७२,००० रुपये रोख, एक मोटारसायकल, ११ मोबाईल फोन, एक सोन्याचे मंगळसूत्र आणि तीन बनावट आधार कार्ड जप्त केलं आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नPoliceपोलिस