शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

खंडणी न दिल्याने दुकानदाराला मारहाण करीत टोळक्याने पसरविली दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 5:37 PM

आरोपींनी बेकायदा जमाव जमवून दळवी यांच्याकडे खंडणी मागितली.

पिंपरी : दोन हजार रुपयांची खंडणी मागितली असता ती देण्यास नकार दिल्याने दुकानदाराला मारहाण टोळक्याने परिसरात दहशत पसरविली. ही घटना दिघीतील संत तुकारामनगर येथे रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. मुन्ना उर्फ राजेश रविशंकर तिवारी (वय २२, रा. विठ्ठल रखुमाई सोसायटी, मोरेवस्ती, चिखली), अमित चंद्रकांत सोनवणे (वय-२४, रा. गुरुकृपा कॉलनी, सिद्धेश्वर हायस्कूलजवळ, दिघी रोेड, भोसरी), विजय मनबहादूर थापा (वय २३, रा. विकास कॉलनी, संतोषीमाता मंदीरासमोर, लांडेवाडी, भोसरी) यांना अटक केली असून अल्पेश मुरकर (रा. लांडेवाडी, भोसरी) याच्यासह इतर दोन ते तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लक्ष्मण वाघोजी दळवी (वय ७५, रा. संत तुकारामनगर, मानस सरोवर, दिघी रोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फियार्दी दळवी हे संत तुकारामनगर येथील सागर प्रोव्हिजन स्टोअर या त्यांच्या दुकानात असताना त्याठिकाणी आलेल्या आरोपींनी बेकायदा जमाव जमवून दळवी यांच्याकडे दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. त्यावेळी दळवी यांनी नकार दिला असता त्यांना दुकानातून बाहेर ओढून धमकी देत शिवीगाळ केली. तसेच त्यांना आरोपी हाताने मारहाण करीत असताना त्यांची सोडवणूक करण्यासाठी सचिन फुगे आले असता त्यांना देखील आरोपींनी शिवीगाळ व हाताने मारहाण करीत परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस