शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील आंबिल ओढा झोपडपट्टीत टोळक्याने फोडल्या १५ गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 19:15 IST

शहरात रात्री अपरात्री किरकोळ कारणावरुन रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक करुन त्यांच्या काचा फोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत़....

पुणे : दांडेकर पुलाजवळील आंबिल ओढा परिसरात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या १५ गाड्यांवर दगडफेक करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री ११ वाजता घडला़. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.आंबिल ओढा येथील सर्व्हे नंबर १३२ येथील झोपडपट्टीत ही घटना घडली़. या प्रकरणी टेम्पोचालक नेताजी डांगे यांनी फिर्याद दिली आहे़. या तोडफोडीत १३ दुचाकी, १ मोटार आणि १ रिक्षाचे नुकसान झाले आहे़. शहरात रात्री अपरात्री किरकोळ कारणावरुन रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक करुन त्यांच्या काचा फोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत़. प्रामुख्याने झोपडपट्टी व दाट वस्तीच्या परिसरात या घटना सातत्याने घडत आहेत़. दांडेकर पुलाजवळील सर्व्हे नंबर १३२ येथील झोपडपट्टीमध्ये बाहेर दुचाकी वाहने लावण्यात आल्या होत्या़. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास टोळक्याने लोखंडी रॉडने रस्त्याकडेच्या दुचाकी गाड्या फोडण्यास सुरुवात केली़ त्याचा आवाज ऐकून नेताजी डांगे हे बाहेर आले़. त्यांनी मुले गाड्यांची तोडफोड करीत असल्याचे पाहून आरडाओरडा केला़. तेव्हा लोक घरातून बाहेर आले़ हे पाहून हे चौघेही जण पळून गेले़. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले़. त्यांनी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज पाहून तोडफोड करणाऱ्या चौघांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला़. ही मुले परिसरातीलच असल्याचा पोलिसांचा संशय आहे़ दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत़.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलर