शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

सोशल क्लबच्या नावाखाली सुरु असलेला जुगारअड्डा उधळला, माजी नगराध्यक्षांच्या पतीसह ५० जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 2:43 PM

jalgaon Crime News : सोशल क्लबच्या नावाखाली सुरु असलेले जुगाराचे दोन अड‌्डे सहायक पोलीस अधीक्षकांनी मध्यरात्री उधळून लावले.

जळगाव - सोशल क्लबच्या नावाखाली सुरु असलेले जुगाराचे दोन अड‌्डे सहायक पोलीस अधीक्षकांनी मध्यरात्री उधळून लावले. त्यात धरणगावच्या माजी नगराध्यक्षांचे पती ज्ञानेश्वर भादू महाजन यांच्यासह ५० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ लाख ३० हजाराची रोकड, मोबाईल, दुचाकी व चारचाकी मिळून असा एकूण २१ लाख ५२ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई चित्रा चौकानजीकच्या मनिष कॉम्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर व कोंबडी मार्केटनजीकच्या जेएमपी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर रात्री दीड वाजता झाली.चित्रा चौकातील मनिष कॉम्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर योगेश्वर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ धरणगाव या नावावर ज्ञानेश्वर भादू महाजन (५३, रा.मोठा माळी वाडा, धरणगाव) यांनी हा जुगारअड्डा सुरु केला होता. या कारवाईत महाजन यांच्यासह जितेंद्र प्रल्हाद माळी (३८,रा.जळगाव), चारुदत्त रवींद्र पाटील (२८, रा.बळीराम पेठ), हरिश्चंद्र प्रल्हाद बडगुजर (४०, रा.शनी पेठ), हेमेंद्र संजय महाजन (३२, रा.नवी पेठ), प्रवीण रमेश पाटील (४०, रा.आर.एल.कॉलनी), ललित गणेश चौधरी (२६, रा.ईश्वर कॉलनी), सलीम खान मुसा खान (५५, रा.शिवाजी नगर), अनिल माधवराव दायमा (५६, रा.पोलन पेठ), रोहीत राजेंद्र शिंदे (२०, रा.ईश्वर कॉलनी), हितेंद्र मोतीलाल शर्मा (३६, रा.मानराज पार्क), अशोक सुभाष शर्मा (३५, रा.कांचन नगर), प्रवीण तुकाराम हिंगोले (२७, रा.मायादेवी नगर), जितेंद्र अनिल सोनार (३४, रा.विठ्ठल पेठ), सैय्यद रिजवान सैय्यद जाफर (४६, रा.भुसावळ), भूषण साहेबराव पाटील (३५, रा.पारेख नगर), शेख शकील शेख रशीद (५५, रा.मेहरुण), अरुण वामन पाटील (५५, रा.गार्डी, ता.जळगाव), मोतीलाल ताराचंद पुषनानी (६५, रा.सिंधी कॉलनी, पाचोरा), रहेमतुल्ला खान गुलशेर खान (५२, रा.रावेर), संदीप सुधाकर चौधरी (३५, रा.शिवकॉलनी), सतीश रामकृष्ण चौधरी (५४, रा.खोटे नगर), सुरेश सिताराम कोळी (४२, सदगुरु नगर), समाधान प्रभाकर सपकाळे (३८, रा.आयोध्या नगर), सैय्यद इर्शाद अली बालम अली (४२, रा.गेंदालाल मील),मुनाफ रहिम मनियार (५६, रा.धरणगाव), शेख इब्राहीम शेख चॉद (५९, काट्या फाईल), गणेश आत्माराम महाजन (३६, रा.धरणगाव),रवींद्र प्रताप क्षत्रीय (३९, रा.धरणगाव),मनोज जयंतीलाल राज (५८, रा.बोरिवली, मुंबई), सचिन दामू गवळी (३९,रा.दाळफळ, शनी पेठ), गोपाळ वासुदेव बडगुजर (३०,रा.धरणगाव), गुड्डू लांगड सहानी (३६, रा.सुप्रीम कॉलनी), गोविंदा विठ्ठल डापसे (४०, रा.असोदा रोड), शेख अब्दुल्ला शेख रहेमान (५६, रा.धरणगाव), मयुर नरेंद्र चंदनकर (४४, रा.बळीराम पेठ) व सागर भिमराव सोनवणे (३६, रा.वाल्मिक नगर) यांना अटक करण्यात आली. येथून १ लाख ८५ हजार रुपये रोख, मोबाईल, दुचाकी, चारचाकी (क्र.एम.एच.१९ डी.एल.७१७१) असा एकूण १९ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दुसऱ्या कारवाईत १३ जण अटकजे.एम.पी.मार्केटमधील कारवाईत बापू रघुनाथ सूर्यवंशी (३८,रा.गेंदालाल मील), जुबेर फारुख खान (३१, रा.मास्टर कॉलनी), नजीर शफी पिंजारी (५०, रा.जुना कोळी पेठ), अब्दुल आहेद अब्दुल रहेमान (४४, रा.शनी पेठ), शेख फयाजोद्दीन कमरोद्दीन (४३, रा.शनी पेठ), आबेदखान शबीर खान (३७, रा.तांबापुरा), अरमान रज्जाक पटेल (२८,रा.गेंदालाल मील), मयुर संजय जगताप (२७, रा.द्वारका नगर), परशुराम बन्सी चावरे (४९, रा.वाल्मिक नगर), सलीम शहा अब्बास शहा (५५, रा.रथ चौक), तुषार नरेंद्र वरयाणी (३९, रा.सिंधी कॉलनी), सुखदेव ज्योतीराम गवळी (५१, रा.रामेश्वर कॉलनी) व पंकज शरद पवार (२८,रा.द्वारका नगर) यांना अटक करण्यात आली. येथून ३६ हजाराची रोकड, मोबाईल व दुचाकी असा एकूण १ लाख ८१ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सकाळपर्यंत चालली कारवाईदोन्ही जुगार अड्यावर रात्री दीड वाजता कारवाई केल्यानंतर सर्व संशयितांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. सकाळी साडे आठ वाजेपर्यंत कारवाईची प्रक्रीया चालली. दोन्ही गुन्ह्यातील संशयितांना सकाळी जामीनावर मुक्त करण्यात आले. हवालदार विजय निकुंभ व उमेश भांडारकर यांच्या फिर्यादीवरुन स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव