शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

मित्रांना रडू आवरले नाही; जेवताना श्वसन नलिकेत अन्न अडकल्याने पोलिसाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 4:51 PM

Police Death : मस्के यांच्या अचानक जाण्यामुळे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मित्रांना रडू आवरले नाही.

ठळक मुद्देमहेंद्र मस्के (३४) असे या पोलीस अंमलदाराचे नाव असून नालासोपारा पोलीस ठाण्यात नेमणूक होती.

नालासोपारा : शांत, सदैव हसरा आणि मनमिळावू ३४ वर्षीय पोलीस अंमलदाराचा रविवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाल्याने पोलिसांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेंद्र मस्के (३४) असे या पोलीस अंमलदाराचे नाव असून नालासोपारा पोलीस ठाण्यात नेमणूक होती.महेंद्र मस्के हे वसई न्यायालयात काम करत होते. रविवारी रात्री पोलीस कर्मचारी, न्यायालयातील कोर्ट कारकून, शिपाई मित्रांसोबत कामण येथील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवताना श्वसन नलिकेत अन्न अडकल्याने श्वास घेण्यास त्रास झाल्याने मृत्यू झाला आहे. त्याला उपचारासाठी संस्कृती हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी झटपट तपासण्या करून ऑक्सिजन लावला, पण उपचारादरम्यान मृत्यू झाला. रात्री त्याचा मृतदेह रिद्धिविनायक हॉस्पिटलच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला. सोमवारी सकाळी शवविच्छेदन करण्यासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये मृतदेह पाठवून जळगाव येथील मूळ गावी त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन लहान मुली, पत्नी असा परिवार आहे. मस्के यांच्या अचानक जाण्यामुळे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मित्रांना रडू आवरले नाही.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूfoodअन्नhotelहॉटेल