शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 1:46 PM

वजीराबाद ठाण्यात गुन्हा दाखल : नामांकित कंपन्यांच्या बियाणांची उगवण क्षमता २५ टक्केच

ठळक मुद्देसदर प्रकरण लोकमतने लावून धरल्यानंतर इंदौर येथील एका सोयाबीन कंपनीवर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  संदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद ठाण्यात सदर कंपनी विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीनिवास भोसले

नांदेड - बोगस सोयाबीन विक्री केल्यामुळे शेकडो हेक्टरवर उगवून होऊ न शकल्याने करोडो रुपयांचे नुकसान शेतकर्‍यांना सहन करावे लागले. सदर प्रकरण लोकमतने लावून धरल्यानंतर इंदौर येथील एका सोयाबीन कंपनीवर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकर्‍यांनी मृगनक्षत्रात खरिपाची पेरणी केली. मात्र ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी करून लागवड केली. अशा अनेक शेतकर्‍यांचे बियाणे उगवले नाही. अशा शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बोगस बियाणे बाजारात आणून विक्री करणारे व्यापारी व संबंधित कंपनीवर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्‍यांसह विविध संघटनांनी केली होती. दरम्यान, सदर प्रकरण 'लोकमत'ने लावून धरल्यानंतर उच्च न्यायालयाने सदर कंपन्या आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच स्वतःहून न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. दरम्यान नांदेडात दाखल करण्यात आलेला हा राज्यातील पहिलाच गुन्हा असल्याचे बोलले जात आहे. सोयाबीन बियाणे उत्पादन करणाऱ्या या इंदौरमधील नामांकित कंपनीचे बियाणे 25% उगवण क्षमता असलेले बीज परीक्षण प्रयोगशाळा परभणी यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. बियाणांची उगवण क्षमता 70टक्के असणे गरजेचे असते. दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद ठाण्यात सदर कंपनी विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत उच्च न्यायालयाने दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेचाही संदर्भ देण्यात आला आहे.या प्रकरणाची दखल घेत कृषी सहनियंत्रण समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तक्रारी प्राप्त कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार वजिराबाद पोलिस ठाण्यात इंदौर येथील इगल सीड अ‍ॅण्ड बायोटेक लिमिटेड कंपनीवर गुन्हा करण्यात आला आहे. एखाद्या कंपनीवर बोगस बियाणे विक्री प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची या वर्षांमधील पहिलीच कारवाई आहे. दरम्यान जिल्ह्यातील बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारींची संख्या चार हजारावर पोहोचली आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

 

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNandedनांदेड