'आय लव्ह यू मेरी जान'; शिक्षिकेला बघून अश्लील शेरेबाजी करणे पडले महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 16:10 IST2022-11-29T16:09:17+5:302022-11-29T16:10:01+5:30
व्हिडिओमध्ये विद्यार्थी सतत अश्लील शेरेबाजी करताना ऐकू येतात.

'आय लव्ह यू मेरी जान'; शिक्षिकेला बघून अश्लील शेरेबाजी करणे पडले महागात!
महाविद्यालयाच्या महिला शिक्षिकेसोबत विद्यार्थ्यांनीच गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील मेरठमधून समोर आला आहे. १२वीत शिकणाऱ्याा विद्यार्थ्यांनी या घटनेचा व्हिडीओही व्हायरल केला असून, काही विद्यार्थी महिला शिक्षिकेला 'आय लव्ह यू' म्हणताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये विद्यार्थी सतत अश्लील शेरेबाजी करताना ऐकू येतात. शिक्षिका जात असताना 'आय लव्ह यू मेरी जान' म्हणतानाही ऐकू येते. किठोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राम मनोहर मेमोरियल इंटर कॉलेजमधील ही घटना आहे. याप्रकरणी शिक्षिकेवर अश्लील टिप्पणी व छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी एका मुलीसह चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून बारावीचे तीन विद्यार्थी छळ करत असल्याची तक्रार शिक्षिकेने शुक्रवारी दाखल केली होती.
शाळेत किंवा घरी परतत असताना अनेकदा अश्लील शेरेबाजी करतात, त्यांच्यासोबत एक विद्यार्थिनीदेखील असते, अशी तक्रार होती. व्हायरल व्हिडीओमुळे मानसिक त्रास होत असल्याचेही शिक्षिकेने म्हटले होते. त्या तक्रारीच्या आधारे चार विद्यार्थ्यांवर कलम ३५४, ५०० आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. मेरठ पोलिसांनी चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आणि बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. पुढील तपास सुरु आहे.