पिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 19:55 IST2018-11-20T19:55:01+5:302018-11-20T19:55:57+5:30
दुचाकीवरून आलेल्या संशयितास पोलिसांनी हटकले. त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांविषयी चौकशी केली.

पिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : पिंपरी परिसरात गस्त घालत असताना,पोलीस कर्मचारी विकास रेड्डी,विद्यासागर भोते यांना दुचाकी चोरट्याची माहिती मिळाली. संशयितरित्या वावरत असताना त्याला हटकले. दुचाकीच्या कागदपत्रांची त्याच्याकडे कागदपत्रांची चौकशी केली. त्यावेळी तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अधिक चौकशी केली असता, दुचाकी चोरीची असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडून मंगळवारी आणखी चार गुन्हे उघडकीस आले. चार दुचाकी, एक टेम्पो असा मिळुन सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल चोरट्याकडून जप्त करण्यात आला. विनोद श्यामराव लोखंडे (वय ३३, मिलिंदनगर) असे चोरट्याचे नाव आहे.
दुचाकीवरून (वाहन क्रमांक एमएच १४,सीवाय. ८२७३) आलेल्या संशयितास पोलिसांनी हटकले. त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांविषयी चौकशी केली. त्याच्याकडे कागदपत्र नसल्याचे लक्षात आले. अधिक चौकशी केली असता, त्याने आणखी तीन दुचाकी तसेच एक मोटार चोरल्याची कबुली दिली. चार दुचाकी आणि एक टेम्पो चोरल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन तसेच अपर पोलीस आयु्कत मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त परिमंडल एक स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे, सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख,पोलीस हवालदार राजेंद्र राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, राजू काकडे, पोलीस नाईक महादेव जावळे, विकास रेड्डी, विष्णू भारती, सोमेवर महाडिक, नामदेव राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.