शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

कोरोनाग्रस्त माजी खासदाराचा मृत्यू, मृतदेह मिळविण्यासाठी पत्नीची उच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 9:40 PM

Due to Corona Ex MP Died : तब्येत लक्षणीय बिघडल्यानंतर त्यांना दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देसोमवारी शहाबुद्दीन यांच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टम करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर त्याचा मृतदेह मंगोलपुरी कब्रस्तानात दफन केला जाईल.

नवी दिल्ली - बिहारचे बाहुबली नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांचे शनिवारी कोरोनामध्ये संसर्ग झाल्यामुळे निधन झाले. शहाबुद्दीन तिहार तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. ते बिहारमधील सिवानमधील आरजेडीचे माजी खासदार होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेतलीआणि शहाबुद्दीनचा मृतदेह बिहारला नेण्याची मागणी केली, परंतु सुनावणीच्या वेळी हायकोर्टाने कुटुंबीयांना तसे करण्यास परवानगी दिली नाही. कोविड प्रोटोकॉलअंतर्गत शहाबुद्दीनच्या पार्थिवाला दिल्लीत दफन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने तुरूंग प्रशासनाला दिले आहेत. सोमवारी शहाबुद्दीन यांच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टम करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर त्याचा मृतदेह मंगोलपुरी कब्रस्तानात दफन केला जाईल.तिहार कारागृह क्रमांक दोनमध्ये बंदिस्त असलेल्या शहाबुद्दीनवर यापूर्वी तुरूंग परिसरातील रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना 20 एप्रिल रोजी हरी नगर येथील दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. येथे सतत अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.कोरोना संसर्ग झाल्याची बातमी होतीशहाबुद्दीनची प्रकृती बिघडल्यानंतर त्याची कोरोना टेस्ट केली गेली. 21 एप्रिल रोजी त्याच्या अहवालात, त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती प्राप्त झाली. यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत लक्षणीय बिघडल्यानंतर त्यांना दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.निष्काळजीपणाचा आरोपदिल्लीत आरजेडीचे माजी खासदार शहाबुद्दीन यांच्या मृत्यूबद्दल कुटुंबीयांनी जेल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही शहाबुद्दीनशी योग्य वागणूक दिली नाही असे म्हटले आहे. आता बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून शहाबुद्दीन यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी मांझी यांच्या हिंदुस्थानी अवामा मोर्चा पक्षाने केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीjailतुरुंगBiharबिहारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलMember of parliamentखासदारHigh Courtउच्च न्यायालय