मथुरेत परदेशी तरुणीवर पाकिस्तानी युवकाकडून बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 18:49 IST2020-09-03T18:49:21+5:302020-09-03T18:49:47+5:30
पीडित मुलीच्या घरी त्याचं येणं जाणं होतं. तक्रारीनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पाकिस्तानी असून तो वृंदावनमध्ये कसा राहत होता, त्याच्याकडे कायदेशीर कागदपत्रं आहेत का, याबाबत पोलीस आता चौकशी करत आहेत.

मथुरेत परदेशी तरुणीवर पाकिस्तानी युवकाकडून बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कृष्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मथुरेत दुष्कृत्य घडल्याने खळबळ माजली आहे. या कृष्ण नगरीत एका अल्पवयीन परदेशी मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. ही परदेशी मुलगी युक्रेनची असून गेल्या ५ वर्षांपासून तिथे राहते आहे. आरोपी पाकिस्तानी युवकाचे नाव आनंद असून तो पीडीत मुलीच्या कुटुंबियांच्या परिचयाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पीडित मुलीचे वडील हे तिथे भजनाच्या कार्यक्रमात वाद्य वाजविण्याचं काम करतात. तसेच आरोपी आनंद हा देखील तिथे संगीत शिकविण्याचं काम करतो. त्याने मुलीला आमिष दाखवून निर्जनस्थळी नेले आणि बलात्कार केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आनंद हा पाकिस्तानातल्या कराची येथे राहणार असून गेले काही वर्ष तो वृंदावनमध्येच राहत होता. पीडित मुलीच्या घरी त्याचं येणं जाणं होतं. तक्रारीनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पाकिस्तानी असून तो वृंदावनमध्ये कसा राहत होता, त्याच्याकडे कायदेशीर कागदपत्रं आहेत का, याबाबत पोलीस आता चौकशी करत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक
आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा
सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर
ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त