जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 16:23 IST2025-11-16T16:22:56+5:302025-11-16T16:23:21+5:30
या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल होताच, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत, अमनला ताब्यात घेतले.

जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
उत्तर प्रदेशातील झांसी येथील एका प्रसिद्ध सराफा व्यापाऱ्याच्या मुलाचा एक गलिच्छ व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. त्याचे एका बार-रेस्टॉरंटमधील हे अश्लील कृत्य समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. अमन अग्रवाल असे या तरुणाचे नाव असल्याचे समजते. ही घटना नाबाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बार-रेस्टॉरंटमध्ये घडली.
तरीही अमन तिला जबरदस्तीने मिठी मारतो अन...!
सुमारे 36 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये, अमन अग्रवाल दोन युवतींसह रेस्टॉरंटमध्ये येतो आणि रिसेप्शनवर तैनात असलेल्या एका युवतीशी बोलत असतो. वातावरण हलकेफुलके असल्याचे दिसते. परंतु अचानक अमन त्या रिसेप्शनिस्टला फ्लाइंग किस देतो. यानंतर लिफ्टकडे जाताना तो पुन्हा थांबतो आणि तिच्याकडे परत येतो. युवती घाबरून मागे सरकते, तरीही अमन तिला जबरदस्तीने मिठी मारतो आणि दोन वेळा गालांवर किस करतो. त्याच्यासोबत आलेली युवती हे सर्व पाहत हसताना दिसते. अचानक घडलेल्या या कृतीने रिसेप्शनिस्ट तरुणी काही क्षणासाठी गोंधळून जाते.
यूपी –
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) November 15, 2025
जिला झांसी में करोड़पति सर्राफा कारोबारी के बेटे अमन अग्रवाल ने शराब के नशे में होटल की बार रिसेप्शनिस्ट का हाथ पकड़ा, बाहों में लेकर Kiss किया। पीड़िता की शिकायत पर आरोपी अमन अग्रवाल गिरफ्तार है।
pic.twitter.com/lcNwwC8GRp
यानंतर, तिने सहकाऱ्यांना माहिती दिली आणि थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. अमन नशेत होता आणि त्याने अश्लील वर्तन केल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याचदरम्यान या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल होताच, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत, अमनला ताब्यात घेतले. यासंदर्भात बोलताना, प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे नाबाबाद पोलीस ठाण्याचे प्रमुख जे.पी. पाल यांनी म्हटले आहे.