शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 09:07 IST

Dmat Account Cyber Fraud: डीमॅट अकाऊंट असलेल्या कंपनी आणि सीडीएसएलकडे याची तक्रार केली परंतू, त्यांनी काहीही कारवाई केली नाही, अखेर पोलिसच त्याच्या मदतीला आले आहेत. 

आधी बँक अकाऊंट सुरक्षित नव्हती, आता डीमॅट अकाऊंटही सुरक्षित राहिलेली नाहीत. नोएडामध्ये एका व्यक्तीचे पाच लाख रुपयांचे शेअर्स रातोरात वळते करण्यात आले आहेत. दुसऱ्या दिवशी शेअर बाजार सुरु होताना जेव्हा त्याला समजले तेव्हा तो व्यक्ती शॉक झाला होता. त्याने डीमॅट अकाऊंट असलेल्या कंपनी आणि सीडीएसएलकडे याची तक्रार केली परंतू, त्यांनी काहीही कारवाई केली नाही, अखेर पोलिसच त्याच्या मदतीला आले आहेत. 

नोएडा सेक्टर ११८ मध्ये राहणाऱ्या एका तरुणाच्या खात्यातून शेअर्स काढून घेण्यात आले आहेत. ते दुसऱ्या कोणत्यातरी खात्यात वळते करण्यात आले आहेत. रोहित नवानी असे या तरुणाचे नाव असून त्याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डीसीपी सायबर प्रीती यादव यांनी सांगितले.

डीमॅट खाते कोणत्या वॉलेटला जोडलेले होते आणि ते शेअर्स कुठे वळते केले गेले याची माहिती घेतली जात आहे. २२ एप्रिलला त्याच्या खात्यातून हे शेअर वळते झाले आहेत. जवळपास ५०० शेअर होते. रात्री उशिरा त्याच्या डीमॅट खात्यातून हे शेअर वळते झाले आहेत. २२ एप्रिलला डीमॅट अकाऊंटवरून काही ओटीपी आले. हे ओटीपी मोबाईल नंबरवर नाहीतर मेल आयडीवर आले. याबरोबर त्याने सेंट्रल डिपॉजिटरी सर्विसेज लिमिटेड (CDSL) कडे तक्रार केली, डीमॅट खात्याच्या कंपनीकडेही तक्रार केली. परंतू त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मेल चेक केला तर त्यात रीड झालेले होते. डीमॅट अकाऊंट चेक केले तर त्यात शेअरची संख्या शून्य होती.

सायबर पोलीस काय म्हणतायत...

सायबर गुन्हेगारांनी आपली पद्धती बदलली आहे. पीडिताचा मोबाईल हॅक झाला आहे, त्याच्या मोबाईवर आलेले सर्व ओटीपी तिकडे जात आहेत. याद्वारे ठकांनी हे शेअर ट्रान्सफर केले आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच अशा प्रकारचा हा पहिलाच फ्रॉड असल्याचे ते म्हणत आहेत.  

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमshare marketशेअर बाजार