शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेटस्वाराला १० हजार रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 21:26 IST

फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेटस्वाराविरुद्ध वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून, एका युवकाला बुलेटचा शौक महागात पडला. वाहतूक पोलिसांनी या युवकाला तब्बल १० हजार ३०० रुपयांचा दंड आकारला.

ठळक मुद्देनागपूर वाहतूक पोलिसांची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेटस्वाराविरुद्ध वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून, एका युवकाला बुलेटचा शौक महागात पडला. वाहतूक पोलिसांनी या युवकाला तब्बल १० हजार ३०० रुपयांचा दंड आकारला. नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आल्याची वाहतूक शाखेच्या इतिहासातील ही पहिली कारवाई ठरली आहे.अंकुश कांबळे असे कारवाई करण्यात आलेल्या बुलेटस्वाराचे नाव आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित हे मंगळवारी दुपारी गस्त घालत होते. कडबी चौक ते मंगळवारी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर बुलेटस्वार हेल्मेट न घालता राँग साईडने येताना दिसला. पंडित यांनी पाठलाग करून त्याला पकडले. वाहनाचे कागदपत्र मागितले असता त्याच्याजवळ नव्हते. बुलेटच्या मागे फॅन्सी नंबर प्लेट आढळली. वाहतूक पोलिसांनी मोटर वाहन कायद्याच्या विविध १४ कलमानुसार त्याच्याविरुद्ध कारवाई करून १० हजार ३०० रुपये दंड आकारला. ही रक्कम अधिक असल्यामुळे अंकुश दंडाची रक्कम जमा करू शकला नाही. त्यामुळे इंदोरा वाहतूक पोलिसांनी त्याची बुलेट जप्त केली. वेगाने बुलेट व मोटारसायकल चालविणाऱ्यांविरुद्ध वाहतूक शाखा पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. फटाक्यांच्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे नियमांचा भंग करणाºया बुलेटस्वारांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिला आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर