फेसबुकवर महात्मा गांधी यांची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 22:24 IST2018-10-30T22:21:39+5:302018-10-30T22:24:16+5:30
फेसबुकवरील ‘मेम्स आॅफ महात्मा’, ‘गांधी मेमेज’, महात्मा मेमेचंद‘या तीन पेजेसवरून महात्मा गांधी यांच्याबद्दल अश्लिल लिखाण केलेल्या पोस्ट टाकण्यात आल्या.

फेसबुकवर महात्मा गांधी यांची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल
पुणे : फेसबुकवरील पेजवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अश्लिल शेरेबाजी करून त्याचे फोटो टाकल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे फेसबुक पेज चालविणाºयावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
याप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी फिर्याद दिली आहे. फेसबुक पेजवर ‘मेम्स आॅफ महात्मा’, ‘गांधी मेमेज’, महात्मा मेमेचंद‘या तीन पेजेसवरून महात्मा गांधी यांच्याबद्दल अश्लिल लिखाण केलेल्या पोस्ट टाकण्यात आल्या, त्यांचे फोटोही शेअर केले आहेत. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे पेजेस चालविणाºयांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी खडक पोलीस ठाण्यात सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महात्मा गांधी यांनी जगाला अहिंसेची देणगी दिली़ सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांची जयंती उत्साहाने विविध उपक्रमांमधून साजरी केली जाते. असे असताना महात्मा गांधींची बदनामी करणारी मोहिम या फेसबुक पेजेसद्वारे सुरू झाली आहे. त्यामुळे यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.