शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

घटस्फोटीत पत्नीशी दुसऱ्याने विवाह केल्याच्या रागातून दोन गटात तुफान राडा, सहा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 11:09 PM

Pune Crime News : एकाने घटस्फोट दिल्यानंतर दुसऱ्याने त्याच्या पत्नीशी लग्न केल्याच्या रागातून दोन गटात तुफान हाणामारी झाली.

पुणे - एकाने घटस्फोट दिल्यानंतर दुसऱ्याने त्याच्या पत्नीशी लग्न केल्याच्या रागातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात कोयते, काठ्या, दगडाने परस्परांवर वार केल्याने त्यात दोन्ही गटातील ५ जण जबर जखमी झाले आहेत. याप्रकरणी खडकी पोलिसांनी ६ जणांना अटक करुन २२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी हैदर शफा इराणी (वय २४, रा. विष्णुकृपा तरुण मंडळ, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अल अब्बास शौकत इराणी (वय २६) शौकत खाननवाज इराणी (वय ५५), बिलाल खाननवाज इराणी (वय ३५, सर्व रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर) यांना अटक करुन इतर ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे नातेवाईक आहेत. अली अब्बास शौकत इराणी याने त्याच्या पत्नीला सोडून दिले आहे. फिर्यादी याने तिच्यासमवेत लग्न केल्याने आरोपीच्या मनात राग होता. फिर्यादी, त्यांची मावशी मंजु इराणी व मामाचा मुलगा अब्बास इराणी हे शुक्रवारी दुपारी अलीबाबा यांच्या घरासमोर एकत्र असताना आरोपी कोयते, काठ्या, दगड घेऊन आले. त्यांनी फिर्यादी व मंजु इराणी यांच्या डोक्यात कोयत्याने मारले. अब्बास इराणी त्याच्या डोक्यात कोयता व काठीने मारहाण केली. दगडांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला.त्याविरोधात बिलाल इराणी (वय ३६, रा. इराणी वस्ती) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्बास अलीबाबा इराणी (वय २०), हैदर शफा इराणी (वय २३) , अलीबाबा बाबु इराणी (वय ४६, सर्व रा. इराणी वस्ती) यांना अटक केली असून इतर ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्यावर, पाठीवर, तसेच छातीवर मारहाण करुन जखमी केले. तसेच अली अकबर शौकत इराणी यांच्या पायावर चाकूने वार करुन कपाळावर व तोंडावर लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे