जीवघेणा वाद! फक्त 5 रुपयांवरून सुरू झालं भांडण; वेगवान SUV ने लोकांना चिरडण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 12:56 PM2024-01-03T12:56:43+5:302024-01-03T13:06:13+5:30

वेगात असलेल्या एसयूव्ही कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला आहे.

fight started over just rs 5 man hits people with speeding car in delhi | जीवघेणा वाद! फक्त 5 रुपयांवरून सुरू झालं भांडण; वेगवान SUV ने लोकांना चिरडण्याचा प्रयत्न

फोटो - ndtv.in

दिल्लीतील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी व्यक्ती त्याच्या वेगात असलेल्या एसयूव्ही कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही लोकांना चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

दिल्लीच्या सिग्नेचर ब्रिजजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. आता या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी आधी सिग्नेचर ब्रिजजवळ दुकान चालवणाऱ्या राम चंदकडे पिण्यासाठी पाणी मागितल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. राम चंदने त्यांना पाणी दिलं.

राम चंदने त्यानंतर त्यांच्याकडे 5 रुपये मागितले असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि राम चंदला बेदम मारहाण केली. आरोपी तेथून त्यांच्या एसयूव्ही कारमधून निघून गेले. मात्र थोडे पुढे गेल्यावर आरोपींनी कार वळवली आणि फूटपाथवर उभ्या असलेल्या लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. 

यानंतर आरोपींनी कार वळवून घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी नंबर प्लेटच्या मदतीने कारच्या मालकाची ओळख पटवली आहे. मोहम्मद हबीब असं कार मालकाचं नाव आहे. पोलीस आता आरोपींना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
 

Web Title: fight started over just rs 5 man hits people with speeding car in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.