शहरं
Join us  
Trending Stories
1
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
2
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
3
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
4
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
5
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
6
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
7
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
8
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
9
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
10
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
11
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
12
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
13
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
14
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
15
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
16
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
17
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
18
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
19
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
20
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय अस्तित्व संपण्याच्या भीतीने विद्यमान उपसरपंचानेच रचला हत्येचा कट; टाकवे बुद्रुक खून प्रकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 19:20 IST

मुख्य सुत्रधार विद्यमान उपसरपंचाला पोलिसांनी केली अटक

ठळक मुद्देवडगाव न्यायालयाने दिले आरोपीला २९ मे पर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी(दि. २२) रात्री दहाच्या सुमारास कोयत्याचे वार करून त्याचा खून

मावळ : स्वताचे राजकीय अस्तित्व संपण्याच्या भीतीने टाकवे बुद्रुक येथील विद्यमान उपसरपंचानेच खूनाचा कट रचून पुतण्या व त्याच्या मित्रांकडून यश रोहीदास असवले (वय २२) याचा खून केला असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी खूनाचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच रोहिदास राघू असवले (वय ४२ रा.टाकवे) याला पोलिसांनीअटक केली आहे. वडगाव न्यायालयात हजर केले असता २९ मे पर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वडगाव मावळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेला यश याची आई रेखा रोहिदास आसवले ही काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत उपसरपंच रोहिदास राघु आसवले यांनी उभ्या केलेल्या उमेदवाराच्या विरूध्द मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. या विजयात यश याचा मोठा वाटा होता. काही दिवसात सरपंच पदाची निवडणूक होणार होती. सरपंचपदासाठी रेखा आसवले उभ्या राहणार होत्या.त्या सरपंच झाल्यातर आपले महत्व कमी होईल. यशमुळे आपले राजकीय अस्तित्व संपत चालल्याची भावना उपसरपंच रोहिदास याच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे खूनाचा कट रचला. पुतण्या रूतीक बाळू आसवले व त्याच्या मित्रांकडून शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास कोयत्याचे वार करून त्याचा खून करण्यात आला. यानंतर पोलिसांनी अवघ्या पाच तासात सात आरोपींना अटक केली. लोणावळा विभागाचे सहायक पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत व पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी यांनी सोमवारी या घटनेतील अटक  केलेल्यांकडून कसून चौकशी केली असता. उपसरपंचाची माहिती उघड झाली. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या आठ झाली आहे. त्यांच्या कडून मोबाईल, तीन मोटारसायकल व हत्यारे जप्त करण्यात आली आहे.

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकMurderखून