शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
5
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
6
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
7
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
8
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
9
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
10
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
11
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
12
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
13
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
14
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
15
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
16
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
17
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
18
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
19
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! नात्यातील महिलांशी जवळकीच्या संबंधाचा आला संशय; मित्रांनीच केली निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 13:33 IST

हात, पाय, शिर धडावेगळे करत मृतदेह भीमा नदीत फेकला; इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना,

इंदापूर  (बाभुळगाव) : एका २३ वर्षीय युवकाची जिवलग मित्राच्या नात्यातील महिलांशी जवळकीचा संबंध असल्याच्या संशयावरून धारदार शस्त्राने हात, पाय, शिर धडापासुन वेगळे करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही खळबळजनक घटना गणेशवाडी (ता.इंदापूर) येथील नदीपात्राजवळ घडली आहे. 

संजय महादेव गोरवे (वय 23, रा. टाकळी (टेंभुर्णी),ता.माढा, जि. सोलापूर) असे निर्घृण हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत फिर्याद मृत युवकाची आई मंजुषा महादेव गोरवे(वय ५१, रा. टाकळी,ता.माढा,जि.सोलापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याप्रकरणी बावडा येथील दादा कांबळे, लकी विजय भोसले, विकी उर्फ व्यकटेश भोसले व महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, मृत संजय व लकी,विकी व महेश हे एकमेकांचे चांगले मित्र असल्याने संजयवरील मित्रांचे घरी जाणे येणे होते. यातुनच संजयचे लकी, विकी व महेश यांच्या नातेवाईक असलेल्या मनिषा, बायडाबाई व निकिता (नावे बदलुन ठेवली आहेत) यांच्याशी ओळख होऊन त्याचे जवळकीमध्ये रूपांतर झाले होते. जवळकीचा फायदा घेत वरील तिन्ही महिला संजय याला छोट्या-मोठ्या कामासाठी घरी बोलवत असत व त्याच्या गाडीवर बसुन फिरत त्यांची कामे करून घेत होत्या. यावरून संजय व त्यांच्यात जवळकीचे संबंध असल्याचा संशय त्याचे मित्र लकी, विकी व महेश यांना आला. त्यातून त्यांनी संगनमताने संजयचा कायमचा काटा काढण्याचे  ठरविले.

त्याच उद्देशाने आरोपी मित्रांनी संजयला बावडा येथील त्यांचे काका दादा कांबळे यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम असल्याचे खोटे निमंत्रण देत रविवारी संध्याकाळी बावडा येथे बोलावुन घेतले होते.निमंत्रण दिले. व रात्रीच्यावेळी भीमानदीच्या गारअकोले पुलाजवळील नदीपात्राजवळ नेत धारदार हत्याराने संजय याचे दोन्ही हात, दोन्ही पाय व डोके धडावेगळे करत त्याचा निर्घृण खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तोडलेले शरीराचे अवयव इतरत्र फेकून देत नंतर मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याची भीमानदीच्या पात्रात विल्हेवाट लावली.

संजय बावडा येथे मित्राच्या घरी जेवायला गेला तो परत न आल्याने फिर्यादी यांनी दुसर्‍या दिवशीपासुन शोधाशोध सुरू करून संजय बेपत्ता असल्याबाबतची तक्रार टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.१९) रोजी दाखल केली होती.

बेपत्ता संजयचा सर्वत्र शोध सुरू असताना गावातील एकाचा फिर्यादी यांच्या पुतण्याला फोन आला व गारअकोले पुलाजवळ भीमा नदीपात्रात एक प्रेत तरंगत असल्याचे सांगितले. या ठिकाणी फिर्यादी यांचे पतीसह नातेवाईक व ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष जात पाहणी केली असता पाण्यात हात,पाय व डोके नसलेले प्रेत आढळुन आले. तिथे आढळलेले चप्पल, मृतदेहाच्या अंगावरील काळ्या रंगाची बरमुडा पॅन्ट व जन्मत: असलेल्या खुनावरून तो फिर्यादी यांचा मुलगा संजय याचे असल्याचे निष्पन्न झाले. 

त्यानंतर इंदापूर पोलिसांनी अवघ्या दोनच तासात या गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे करत आहेत.——

टॅग्स :IndapurइंदापूरMurderखूनCrime Newsगुन्हेगारीrelationshipरिलेशनशिपPoliceपोलिसArrestअटक