शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

परदेशातील तरुणीशी लग्न केल्यानंतरही थाटला दुसरा संसार अन् किडनी दानासाठी टाकला दबाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 10:02 PM

Crime News : आपण सोबत संसार करु असे सांगितले, मात्र त्याची अंमलबजावणी केलीच नाही. म्हणून मानसी यांनी गुरुवारी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

ठळक मुद्देमानसी यांचे  प्रवीण गिरधर चोपडे याच्याशी एमआयडीसीतील एका लॉनमध्ये अलिशान लग्न झाले होते. त्यांची विवाह नोंदणी अहमदाबाद येथे झाली होती.

जळगाव : श्रीलंकेत एकीशी विवाह झालेला असतानाही जळगावातील तरुणीशी विवाह केली व त्यानंतर किडनी दान करण्यासाठी दबाव टाकला म्हणून पती प्रवीण गिरधर चोपडे, सासरे गिरधर दामोदर चोपडे व सासु अलका गिरधर चोपडे (सर्व रा.डोंगलुर, बंगळुरु, कर्नाटक) यांच्याविरुध्द गुरुवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फसवणूक व छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मानसी चंद्रकांत पाटील (२७, रा.दौलत नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी यांचे  प्रवीण गिरधर चोपडे याच्याशी एमआयडीसीतील एका लॉनमध्ये अलिशान लग्न झाले होते. त्यांची विवाह नोंदणी अहमदाबाद येथे झाली होती. लग्नात आठ लाखाचे दागिने व अडीच लाखाचा धनादेश पतीला दिला होता.  लग्नानंतर प्रवीण हा मानसीला मनीनगर, अहमदाबाद येथे नांदावयास घेऊन गेला. १५ दिवस सुखाचा संसार चालल्यानंतर पती सारखा मोबाईलवर बोलत असल्याने मानसीने विचारणा केली असता गलिच्छ बोलून तिला अपमानीत केले. तुला हाकलून देईल व नांदवणार नाही असे सांगून दम दिला. त्यानंतर १७ जून २०१७ रोजी प्रवीण अमेरिका जावून येतो असे सांगून घरुन निघून गेला. त्यानंतर अधूनमधून एक दोन वेळाच मोबाईलवर बोलला. त्यानंतर तीन महिने संपर्कच केला नाही.श्रीलंकेच्या न्यायालयात घटस्फोटाचा अर्जयाच काळात मानसीला घरातील कागदपत्रांवरुन २६ जुलै २०१४ रोजी प्रवीण याचे श्रीलेंकेतील नीगे गौडा जिल्हा न्यायालयात दिमतू विजय शेखरा हिच्याशी लग्न झाले आहे व तेथील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल आहे. या प्रकारावरुन जेव्हा वाद झाले तेव्हा मला दिमतू हीच हवी आहे, तू आमच्या घटस्फोटाला कारणीभूत असल्याचे सांगून मानसीचा छळ सुरु केला. त्यानंतर घरातून हाकलून लावल्याचा प्रकार घडला. प्रवीण हा कामानिमित्त बंगळूरु, मुंबई व अहमदाबाद जात असताना त्या काळात सासुने हळूहळू करुन अंगावरील दागिने काढून घेतले. दरम्यानच्या काळात प्रवीण पोटदुखीची तक्रार करायचा. तेव्हाही घरातील डॉक्टरांच्या कागदपत्रांवरुन वाईट सवयीमुळे प्रवीण याच्या किडनी निकाम्या झाल्याचा समजले. उपचारासाठी मानसीच्या पैशावर मुंबई,बंगळुरु असे विमानाने सतत फेऱ्या केल्या. याच काळात पतीला तू किडनी दान कर म्हणून सासु-सासऱ्यांनी दबाव टाकला. सततच्या वादामुळे मानसी २०१८ पासून माहेरीच आहे. उपचारादरम्यान पतीला सासऱ्यांनीच किडनी दान केल्याचे समजले. यानंतरही मानसीने बंगळुरु येथे दोन-तीन वेळा प्रवीणची भेट घेतली. आपण सोबत संसार करु असे सांगितले, मात्र त्याची अंमलबजावणी केलीच नाही. म्हणून मानसी यांनी गुरुवारी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. 

टॅग्स :Domestic Violenceघरगुती हिंसाPoliceपोलिसJalgaonजळगावmarriageलग्न