लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 17:06 IST2026-04-16T17:05:23+5:302026-04-16T17:06:23+5:30

लग्नानंतर प्रियकरासोबत पळालेल्या २५ वर्षीय सत्तेव्वा हेलवारची तिच्याच कुटुंबाने विष देऊन हत्या केली आणि मृतदेह सांगलीत जाळला.

Even after marriage, the lover's voice did not stop; Angry father killed his daughter, 'this' crime revealed | लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा

लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा

कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सत्तेव्वा हेलवार असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने सत्तेव्वाच्या भावाने आणि काकाने तिची हत्या केली. ही घटना केवळ रागाच्या भरात घडली नसून, एका नियोजित कटाचा भाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

लग्नानंतरही प्रेम कायम, अन् तिथूनच सुरू झाला वाद

मिळालेल्या माहितीनुसार, सत्तेव्वाचे तिच्याच गावातील कृष्णा पाटील या तरुणावर प्रेम होते. मात्र, कुटुंबीयांनी या नात्याला कडाडून विरोध केला आणि चार वर्षांपूर्वी तिचे लग्न संतोष हेलवी याच्याशी लावून दिले. लग्न होऊनही सत्तेव्वा कृष्णाला विसरू शकली नाही. अखेर १७ फेब्रुवारी २०२६ रोजी ती आपल्या पतीचे घर सोडून कृष्णासोबत पळून गेली. दोघेही सवादत्ती तालुक्यातील बेलावडी येथे भाड्याने खोली घेऊन राहू लागले.

असा रचला मृत्यूचा सापळा

दोन आठवड्यांपूर्वी कुटुंबीयांनी या दोघांचा शोध घेतला. सुरुवातीला 'आम्ही तुम्हाला स्वीकारतो' असे खोटे नाटक करत त्यांनी सत्तेव्वाचे मन वळवले आणि तिला परत आणले. मात्र, घरी आल्यावर तिच्यावर कृष्णाला सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला. सत्तेव्वा आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे पाहून, तिला महाराष्ट्रातील शिरोळ येथे बहिणीच्या घरी पाठवण्यात आले. तिथून तिला सांगली जिल्ह्यातील आरग (ता. मिरज) येथे नेण्यात आले आणि २१ मार्च रोजी तिला बळजबरीने विष पाजण्यात आले.

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

सत्तेव्वाचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस कारवाई टाळण्यासाठी आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने तिचा मृतदेह स्थानिक स्मशानभूमीत नेऊन जाळून टाकला. सत्तेव्वाचा भाऊ शानुरा हेलवर, काका प्रकाश हेलवर आणि नातेवाईक मयप्पा हेलवी यांनी या गुन्ह्यात मुख्य भूमिका बजावली.

प्रियकराच्या तक्रारीमुळे गुपित उघड

सत्तेव्वाशी संपर्क तुटल्यामुळे कृष्णाला धोका असल्याची जाणीव झाली. त्याने तातडीने यमकनमर्डी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी संशयावरून सत्तेव्वाच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सध्या मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title : शादी के बाद भी अफेयर: पिता ने बेटी को मारा; अपराध उजागर

Web Summary : बेलगाम में, एक महिला की शादी के बाद भी अफेयर जारी रखने पर उसके भाई और चाचा ने हत्या कर दी। परिवार ने पहले स्वीकार करने का नाटक किया, फिर जबरदस्ती जहर देकर शव को जला दिया। प्रेमी की पुलिस शिकायत से सच्चाई सामने आई।

Web Title : Affair After Marriage: Father Kills Daughter; Crime Unveiled

Web Summary : In Belgaum, a woman was murdered by her brother and uncle for continuing an affair after marriage. The family initially feigned acceptance before forcibly poisoning her and burning the body to conceal the crime. The lover's police complaint exposed the truth.