Video : पोलीस पथकावर अतिक्रमणधारकांचा हल्ला; दोघांना घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 14:26 IST2021-10-21T14:23:29+5:302021-10-21T14:26:55+5:30
Attack on police squad : लोणी येथील आरोग्य केंद्रासमोरील अतिक्रमण काढताना बंदोबस्तासाठी हे पोलीस पथक येथे आले होते.

Video : पोलीस पथकावर अतिक्रमणधारकांचा हल्ला; दोघांना घेतलं ताब्यात
जामनेर जि.जळगाव : अतिक्रमण काढण्यासाठी बंदोबस्ताला गेलेल्या पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकावर दोन अतिक्रमणधारकांनी हल्ला केल्याची घटना लोणी ता. जामनेर येथे गुरुवारी सकाळी १०.३० घडली. यात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लोणी येथील आरोग्य केंद्रासमोरील अतिक्रमण काढताना बंदोबस्तासाठी हे पोलीस पथक येथे आले होते. ग्रामपंचायत कर्मचारी नोटीस वाचून दाखवत असतांना अतिक्रमणधारकांनी निरीक्षक अरुण धनवडे व पथकावर हल्ला चढवला. इतर पोलिसांनी त्यांना आवरले. धनवडे यांना मुकामार लागला आहे.
लोणी येथे अतिक्रमण काढण्यासाठी आपल्यासह पोलीस पथक बंदोबस्ताकरीता गेलो होतो. अतिक्रमण धारकांना समजून सांगत असतानाच त्यांनी माझ्यासह पथकावर हल्ला चढवून मारहाण केली. आपणास मुकामार लागला आहे. अतिक्रमणधारकांना ताब्यात घेऊन पुढील कडक कारवाई करण्यात येत आहे. - अरूण धनवडे, पोलीस निरीक्षक, पहूर, ता.जामनेर.