संतापजनक! वृद्ध मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण; 'जय श्री राम' बोलण्याची केली जबरदस्ती, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 08:33 AM2021-06-15T08:33:40+5:302021-06-15T08:36:17+5:30

Crime News :काही तरुणांनी एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना 'जय श्री राम' बोलण्याची सक्ती देखील केली आहे.

Elderly man says ‘beaten, forced to chant Jai Shri Ram’ in Ghaziabad | संतापजनक! वृद्ध मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण; 'जय श्री राम' बोलण्याची केली जबरदस्ती, Video व्हायरल

संतापजनक! वृद्ध मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण; 'जय श्री राम' बोलण्याची केली जबरदस्ती, Video व्हायरल

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. काही तरुणांनी एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना 'जय श्री राम' बोलण्याची सक्ती देखील केली आहे. जबरदस्तीने त्यांना जय श्री राम बोलायला लावलं. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हि़डीओमध्ये काही तरुण वृद्ध व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. 

मिळलेल्या माहितीनुसार, गाझियाबाद जिल्ह्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाने त्या वृद्ध माणसाची दाढी कात्रीने कापली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला आहे. अब्दुल समद सैफी बुलंदशहर येथील रहिवासी असून लोणी येथे जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. आपल्या धर्मामुळेच तरुणांनी आपल्याला लक्ष्य केले असा आरोप त्यांनी केला आहे. अतुल कुमार सोनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्हाला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही माहिती मिळाली. ज्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता."

"घटनेसंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. आम्ही परिसरातील स्थानिक रहिवाशांची विचारपूस करत आहोत आणि इतरही पावले उचलली जातील" असं सोनकर यांनी म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सैफी यांना मारहाण करताना आणि दाढी कापण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमधील आरोपी गाझियाबाद येथील रहिवासी असून प्रवेश गुर्जर असं त्याचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. अब्दुल समद सैफी यांनी देखील याबाबत माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला होता.

"मी ऑटोरिक्षाने जात होतो तेव्हा माझ्यासमोर बसलेल्या दोन व्यक्तींनी माझे अपहरण केले. ते मला घेऊन एका जंगलाच्या ठिकाणी गेले आणि मला मारहाण करण्यास सुरुवात केली. मी त्यांना सोडण्याची विनंती करत राहिलो. त्यांनी मला वारंवार 'जय श्री राम' जप करण्यास सांगितला. त्यांनी माझ्या पाठीवर मारले आणि त्यांनी 'जय श्री राम' म्हणायला पाहिजे, असं  सांगितलं" अशी माहिती सैफी यांनी व्हिडिओमध्ये दिली आहे. आपल्यावर पाच जणांनी हल्ला केल्याचं देखील म्हटलं आहे. पोलीस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Read in English

Web Title: Elderly man says ‘beaten, forced to chant Jai Shri Ram’ in Ghaziabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.